
इगतपुरीनामा न्यूज – माणिकखांब, ता. इगतपुरी येथे रात्री २ ते ३ वाजेच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांकडून ४ मोटारसायकली जाळल्याची घटना आज पहाटे उघडकीस आली. दाट लोकवस्तीमधील घरांच्या समोर उभ्या असणाऱ्या ह्या मोटारसायकली जाळण्याची घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. सुरेश चव्हाण, हरिभाऊ चव्हाण, अनिल भटाटे, राजू भटाटे यांच्या मोटारसायकली जाळण्यात आल्या आहेत. या चार पैकी ३ मोटारसायकली भस्मसात झाल्या आहेत. एक मोटारसायकल कमी प्रमाणात जळाली आहे. या घटनेमुळे माणिकखांब गावात संताप व्यक्त केला जात असून अज्ञात समाजकंटकांचा शोध घेण्याची मागणी करण्यात आली आहे. घोटी पोलिसांना याबाबत कळवण्यात आले आहे.