भाऊबंदकीच्या वादातून चुलत भावाचा केला खून ; इगतपुरीजवळची घटना

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील गिरणारे येथे भाऊबंदकीच्या वादातुन ५० वर्षीय व्यक्तीचा खून झाला आहे. आज सकाळी दहा वाजेच्या सुमाराला झालेल्या शाब्दिक वादाचे रूपांतर धारदार शस्त्राच्या वाराने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. खून झालेला व्यक्ती संशयित आरोपीचा सक्खा चुलत भाऊ असल्याचे कळते आहे. जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्याआधीच संबंधिताचा मृत्यू झाला. मदन बबन गोईकणे वय ५० रा. गिरणारे ता. इगतपुरी जि. नाशिक असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. संशयित आरोपी महेंद्र भरत गोईकणे याच्याबरोबर आज सकाळी मदन गोईकणे यांचा वाद झाला होता. ह्या घटनेत अजूनही काही आरोपी आहेत अशी चर्चा ह्या परिसरात सुरु आहे. संशयित आरोपी महेंद्र गोईकणे याने धारदार शस्त्राने त्यांचा खून केल्याबाबतची फिर्याद देण्यासाठी मयताची पत्नी सिंधूबाई मदन गोईकणे यांनी इगतपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. इगतपुरी पोलिसांनी घटनेची नोंद घेऊन तातडीने आरोपीला ताब्यात घेऊन तपास सुरु केला आहे.

Similar Posts

error: Content is protected !!