इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रूळाजवळ आत्महत्या करण्याच्या तयारीत असणाऱ्या एका युवकाला लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या पोलिसांमुळे नवजीवन मिळाले आहे. रेल्वे पोलिसांनी काही क्षण दक्षता घेतली नसती तर हा युवक येणाऱ्या रेल्वे गाडीखाली आपले जीवन संपवणार होता. पोलीस अंमलदार राजेंद्र बोराळे, हवालदार योगेश साळेकर, रेल्वे सुरक्षा बल उपनिरीक्षक श्री. मिना, जीवन राठोड यांच्यामुळे ह्या युवकाचा जीव वाचला आहे. हे सर्वजण रेल्वे स्टेशन इगतपुरी येथे डयुटीवर असतांना रेल्वे स्टेशनवर गस्त करीत असतांना डाउन लुप लाईनवर एक इसम आत्महत्या करण्याचे तयारीत रेल्वे लाईनच्या रुळावर बसलेल्या स्थितीत त्यांना दिसला. तातडीने सर्वांनी तिकडे वेगाने धावून जात युवकाला ताब्यात घेतले. काही क्षणातच डाउन लाईनवरून मेल गाडी वेगाने निघून गेली. रेल्वे पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखुन समयसूचकता व धाडसाने आत्महत्येच्या तयारीत असणाऱ्या व्यक्तीळा बाजुला केल्याने त्याचा जीव वाचला. पोलीसांनी चौकशी केली असता त्याचे नाव विनोद दौलत निकम वय ३५ ते ४० वर्ष असून तो मनोरूग्ण आहे. तो उल्हासनगर कल्याण येथील रहिवासी आहे. सहा. पोलीस निरीक्षक शबालीजी गोविंदराव शेंडगे यांनी युवकाला पत्नी शितल विनोद निकम यांच्या ताब्यात सुरक्षितपणे सोपवले. रेल्वे पोलिसांच्या कार्यतत्परतेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group