निकृष्ठ जेवण – पिंप्री सदो आश्रमशाळेतील सर्व उपाशी विद्यार्थ्यांचे भर थंडीत ठिय्या आंदोलन सुरु : आदिवासी नेते लकीभाऊ जाधव यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी आक्रमक : वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येऊन प्रश्न सोडवेपर्यंत आंदोलन राहणार सुरु

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील पिंप्री सदो येथील आदिवासी विकास विभागाच्या एकलव्य मॉडेल रेसिडेन्सी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी काही दिवसापासून निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याची गंभीर तक्रार केली आहे. मात्र या तक्रारीवर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नसल्याने येथील सर्व विद्यार्थी संतापले. आज दुपारी आलेले जेवणही दर्जाहीन असल्याने विद्यार्थ्यांनी टेकडीवरील खड्ड्यात फेकले. आज दुपारपासून सर्व विद्यार्थी उपाशी असल्याचे […]

३० हजाराची लाच स्वीकारल्याप्रकरणी इगतपुरी तालुक्यातील ग्रामसेविकेवर गुन्हा दाखल : नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची यशस्वी कारवाई

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील भरवजच्या ग्रामसेविका सुवर्णा छगन आहेर यांच्या विरुद्ध ३० हजाराची लाच स्वीकारल्याने घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तक्रारदार शेती व जमीन खरेदी विक्री खाजगी एजंट म्हणून व्यवसाय करतात. तक्रारदार व त्यांचे मित्र यांनी आदिवासी जमीन बिगर आदिवासी व्यक्तीच्या नावे खरेदी करण्यासाठी जिल्हाधिकारी नाशिक येथे अर्ज केला आहे. […]

रेल्वे प्रवासात साडेचार लाखांचे दागिने चोरणाऱ्या २ जणांना इगतपुरी रेल्वे पोलिसांकडून अटक

इगतपुरीनामा न्यूज – अरूणा रत्नाकर चित्तेवान ह्या आपल्या कुटुंबासह अप अमरावती एक्सप्रेसने भुसावळ ते ठाणे प्रवास होत्या. इगतपुरीतुन गाडी सुटल्यानंतर कसारा घाट येथे गाडी थांबुन सुरू झाल्यानंतर अज्ञात चोरट्याने त्यांची पर्स चोरून त्यातील ४ लाख ४७ हजार ६३४ रूपये किमतीचे सोन्या चांदीचे विविध दागिने हिसकावुन चोरून नेले. म्हणून अरूणा रत्नाकर चित्तेवान वय ६० रा. रामदेव […]

नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस दलाच्या सीसीटीएनएस विभागास द्वितीय क्रमांकाचे राज्यस्तरीय पारितोषिक प्रदान

इगतपुरीनामा न्यूज – १९ वा महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा २०२४ हा ९ ते १२ डिसेंबरला महाराष्ट्र राज्य प्रबोधिनी, रामटेकडी, पुणे व राज्य राखीव पोलीस बलगट १ व २ रामटेकडी, पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. गुन्हे व गुन्हेगार शोध व जोडणी प्रणाली Crime and Criminal Tracking Network and System (C.C.T.N.S) या कार्यप्रणालीमध्ये नाशिक […]

इगतपुरीजवळ १ कोटी ५३ लाख किमतीचा गुटखा जप्त ; एलसीबीचे पीआय राजू सुर्वे यांची कामगिरी

इगतपुरीनामा न्यूज – मानवी आरोग्याच्या दृष्टीने गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू आणि मानवी आरोग्यास हानिकारक खाद्यपदार्थांची विक्री, उत्पादन, साठवणुक, वाहतुक आदी व्यवसायांना प्रतिबंधीत करण्यात आलेले आहे. त्या पार्श्वभूमीवर गुटख्याची वाहतूक, विक्री, वितरण व साठवणूक करणाऱ्यांविरूध्द कारवाई सुरू आहे. त्यानुसार आज इगतपुरी पोलीस ठाणे हद्दीत समृद्धी महामार्गावरील टोलनाक्याच्या जवळ असलेल्या पुलाखाली गुटखा वाहतुक करीत असलेला टाटा ट्रक […]

राष्ट्रीय महामार्गावरील जबरी चोरीचा गुन्हा वाडीवऱ्हे पोलिसांकडून उघड : ३ आरोपी अटक करून मुद्धेमाल आणि वाहन घेतले ताब्यात

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याच्या हद्धीत मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गु.र.नं. 324/2024 भारतीय न्याय संहिता कलम 309 (4),118 (1), 3 (5) प्रमाणे दाखल असलेल्या ह्या गुन्ह्याची वाडीवऱ्हे पोलिसांकडून उकल करण्यात आली आहे. त्यानुसार तपासात ३ आरोपी निष्पन्न करून त्यांना अटक करण्यात आली आहे. कृष्णा दशरथ […]

वाडीवऱ्हे पोलिसांकडून अवैद्य शस्त्र बाळगणाऱ्या विरोधात धडक कारवाई : दोन तलवारी व एक गावठी कट्टा हस्तगत

इगतपुरीनामा न्यूज – विधानसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी हरिष खेडकर यांच्या सूचनेप्रमाणे अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या विरोधात ग्रामीण पोलीस सक्रिय आहेत. यानुसार इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे पोलीस स्टेशनने आचारसंहिता काळात मोठी कारवाई केल्याने वाडीवऱ्हे पोलिसांचे कौतुक केले जात आहे. वाडीवऱ्हे पोलिसांनी केलेल्या […]

वाडीवऱ्हे हद्दीत मुळेगाव येथे गावठी दारूच्या हातभट्ट्या पोलिसांकडून उध्वस्त : ४ लाख ५२ हजाराची गावठी दारू, रसायन केले नष्ट

इगतपुरीनामा न्यूज – वाडीवऱ्हे पोलीस स्टेशनचे पोलीस पथक यांनी अवैध दारू मोहिमे अंतर्गत धडक कारवाई सुरु केली आहे. नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर ह्यांच्या सूचनेप्रमाणे कारवाई करण्यात येत आहे. आज शनिवारी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मुळेगाव वालदेवी नदी भागात सकाळी १० वाजेपासून पोलिसांनी […]

वाडीवऱ्हे हद्दीत गावठी दारूच्या हातभट्ट्या पोलिसांकडून उध्वस्त : ३ लाख ४५ हजाराची दारू व रसायन केले नष्ट

इगतपुरीनामा न्यूज – वाडीवऱ्हे पोलीस स्टेशनच्या पोलीस पथकाने नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अवैध दारू मोहिमे अंतर्गत धडक कारवाई सुरु केली आहे. जवळच असणाऱ्या मुळेगाव भागात आज सोमवार तारखेला सकाळी ६ वाजेपासून पोलिसांनी १० ते १२ किलोमीटर जंगलात पायी चालत जाऊन गावठी हातभट्ट्या तोडल्या. […]

वाडीवऱ्हेजवळ ४ लाख ५० हजारांची हातभट्टीची दारू नष्ट : एलसीबीच्या पोलीस पथकाची सकाळी धडक कारवाई

इगतपुरीनामा न्यूज – आज स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीणचे पोलीस निरीक्षक, राजु सुर्वे, सहा. पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ठोंबरे, पोहवा योगेश पाटील, संदीप नागपुरे, मेघराज जाधव, सचिन देसले, रविंद्र गवळी असे अवैध धंद्याची माहिती घेत होते. यावेळी पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मुळेगाव शिवारात हॉटेल निसर्ग कट्टयाच्या मागे असलेल्या कारवाचे डोंगर […]

error: Content is protected !!