पोलीस असल्याची बतावणी करून निवृत्त शिक्षकाला १ लाखांचा घातला गंडा ; इगतपुरीतील घटना

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरीतील जोगेश्वरी येथून निवृत्त शिक्षक सारंग चिमोटे हे नाशिक येथे जाण्यासाठी निघाले होते. जुन्या महामार्गावरील मधुर सोसायटीसमोर मोटरसायकल वरून आलेल्या अज्ञात चोरट्याने चिमोटे आणि त्यांच्या मागे येणाऱ्या साथीदाराला पोलीस असल्याची बतावणी केली. पुढे एकाकडे कट्टा सापडला असून तुमच्याकडील सोन्याची चैन व अंगठी माझ्याकडे द्या. मी ती रुमालात तुम्हाला बांधून देतो अशी बतावणी […]

खळबळजनक ! बिबट्याच्या हल्ल्यात ३१ वर्षीय तरुणी ठार ; इगतपुरी तालुक्यातील घटना

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यात बिबट्याची दहशत वाढत चालली असून बिबट्याच्या हल्ल्यात आज ३१ वर्षीय तरुणी ठार झाली आहे. निशाणवाडी ( त्रिंगलवाडी ) येथील ही दुर्दैवी तरुणी आहे. या घटनेमुळे ह्या भागात दहशतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेबाबत माहिती मिळताच प्रादेशिक वन परिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांच्या नेतृत्वाखाली वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. मीनाक्षी […]

“योगेश”ने बिबट्याशी कडवी झुंज देऊन ३ शाळकरी मित्रांचे वाचवले जीव : इगतपुरी तालुक्यातील थरारक घटना

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील धार्णोली येथे बिबट्याने विद्यार्थ्यांवर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. बिबट्याशी झुंज देणारा योगेश रामचंद्र पथवे हा दहावीत शिकणारा विद्यार्थी आहे. योगेशचे शाळकरी मित्र प्रविण, निलेश, सुरेश यांच्यासह घरातून शाळेच्या दिशेने जात असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. समयसूचकता दाखवत योगेशने प्राणाची पर्वा न करता प्रसंगावधान राखत मित्रांना […]

घोटी येथील खून प्रकरणी मयताची पत्नी आणि २ युवकांवर खुनाचा गुन्हा दाखल

इगतपुरीनामा न्यूज – घोटी बुद्रुक येथील रुपेश संतु साबळे ४२ वर्षे रा. श्रीरामवाडी घोटी यांना जीवे ठार मारून त्याची ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप केला म्हणून घोटी पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खुनाची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली होती. घोटी बुद्रुक गाव शिवारातील रेल्वे लाईनच्या बाजुला एका शेतात रुपेश संतु साबळे ४२ […]

माणिकखांब भागात ४ काेटी रुपयांचे दागिने लुटणारी टोळी पोलिसांकडून जेरबंद : नाशिक ग्रामीण पोलिसांची दमदार कामगिरी

इगतपुरीनामा न्यूज – मुंबई आग्रा महामार्गावरील माणिकखांब गावाजवळ घाेटी घोटी पोलीस ठाणे हद्धीत साेने चांदीचे दागिने पाेहचविणाऱ्या कुरिअर व्हॅनच्या चालकासह अन्य दोघांना लुटणाऱ्या चार जणांना नाशिक ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. धारदार हत्याराचा धाक दाखवत डाेळ्यात मिरचीची पूड फेकून ४ काेटी रुपयांचे दागिने लुटणारी ही टोळी उत्तर प्रदेश राज्यातील आग्रा येथून ताब्यात घेतली गेली आहे. […]

सामान्य इगतपुरीकरांचे “सिंघम” पोलीस अधिकारी राजू सुर्वे :  कर्तव्य दक्षतेमुळे गुन्हेगारी रोखण्यात यश ; अनेक गुन्हे आणले उघडकीस

इगतपुरीनामा न्यूज – मुंबई क्राईम ब्रॅंचमध्ये उल्लेखनीय काम करून इगतपुरीत पोलीस निरीक्षक म्हणून राजू सुर्वे १० मार्चपासून रुजू झाले. तेंव्हापासून त्यांची स्थानिक गुन्हे शाखेत बदली होईपर्यंत त्यांनी इगतपुरी पोलीस ठाणे हद्धीत आपल्या कामगिरीने पोलीस खात्याची शान वाढवली. जनमाणसात वेगळी प्रतिमा निर्माण करून गुन्हेगारांवर वचक निर्माण केला. त्यांच्या बदलीमुळे सर्वसामान्य इगतपुरीकर नागरिकांच्या डोळ्यांत अश्रू आले आहेत. […]

अयोध्या सोहळा व २६ जानेवारीच्या पार्श्वभूमीवर इगतपुरी रेल्वे स्थानकात पोलिसांची करडी नजर

इगतपुरीनामा न्यूज – अयोध्या येथे सोमवारी प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा २६ जानेवारीच्या पार्श्वभूमीवर इगतपुरी लोहमार्ग पोलीस, रेल्वे सुरक्षा बल, दहशतवादी विरोधी पथक सज्ज झाले आहे. इगतपुरी रेल्वे स्थानकावर किंवा चालत्या रेल्वे गाडीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रेल्वे स्थानकात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. इगतपुरी रेल्वे स्थानकात मुंबईहुन येणाऱ्या व जाणाऱ्या प्रत्येक […]

घोटी – अन्न व औषध प्रशासनाची विना बीआयएस, मिथ्याछाप, लेबलदोष पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर निर्मिती कारखान्यावर धाड

इगतपुरीनामा न्यूज – अन्न व औषध प्रशासनाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त (अन्न), उ. सि. लोहकरे, अन्न सुरक्षा अधिकारी गो. वि. कासार, यांनी १८ जानेवारीला घोटी येथील मे. साईमेवा फुड ॲण्ड बेव्हरजेस येथे छापा टाकला. त्याठिकाणी तपासणीअंती सदर पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरची निर्मिती ही विना बीआयएस प्रमाणपत्र तसेच आक्षेपार्ह लेबल असलेले, मिथ्याछाप व लेबल […]

माणिकखांब जवळ सशस्त्र दरोडा : साडेतीन कोटी रुपयांचे सोने चांदी लंपास

इगतपुरीनामा न्यूज – मुंबई आग्रा महामार्गावर आज पहाटेच्या सुमाराला सशस्त्र दरोडा पडला आहे. सोन्या चांदीचे दागिने घेऊन जाणाऱ्या जय बजरंग कुरिअर सर्व्हिसची इको गाडी क्र. MH 12 UJ 7948 वर पाच सहा अज्ञात व्यक्तींनी सशस्त्र दरोडा टाकला आहे. फिल्मी स्टाईलने महामार्गावरील माणिकखांब गावच्या जवळ गाडीच्या पुढे मागे गाडी आडवी लाऊन ही घटना घडली आहे. ह्या […]

माणिकखांब – बेफाम मोटारसायकलीची साई भक्तांना धडक, २ गंभीर, २ किरकोळ जखमी

इगतपुरीनामा न्यूज – मुंबई आग्रा महामार्गावरील माणिकखांब भागात बेफाम रायडिंग करणाऱ्या रायडरने आज चार पाच साईभक्तांना धडक दिली आहे. या अपघातात दोन साई भक्तांना गंभीर दुखापत झाली असून दोघांना किरकोळ मार लागला आहे. किरकोळ जखमींना घोटीच्या खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गंभीर जखमी झालेल्या दोघांना मुंबईला हलवण्यात आले आहे. नाशिक […]

error: Content is protected !!