लेखन – डॉ. अविनाश गोरे, बालरोगतज्ञ, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा रुग्णालय नाशिक संपर्क – ७९७२४२६५८५. गुलेन /गियान बारे सिन्ड्रोम हा आजार आपल्या केंद्रीय मज्जासंस्थेचा असून आपली इम्युनिटी जेंव्हा चुकीच्या पद्धतीने कार्य करते तेंव्हा होतो. शरीरातील आपली इम्युनिटी जेंव्हा आपल्याच चांगल्या पेशींवर हल्ला करते तेंव्हा अनेक आजार होऊ शकतात त्यांपैकी हा एक आजार आहे. ह्याचा प्रादुर्भाव पुण्याच्या […]
इगतपुरीनामा न्यूज – क्षयरोग दुर्धर आजाराचा उपचार सहा महीने प्रदिर्घ आहे. उपचारादरम्यान चांगला आहार मिळाल्यास प्रतिकार शक्ती वाढून आजारावर मात करणे शक्य आहे. समाजातील दानशूर व्यक्तींनी क्षयरोग रुग्णांसाठी पुढाकार घेऊन मदत करावी असे आवाहन बेलगाव कुऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विश्वनाथ खतेले यांनी केले. इगतपुरीचे तालुका वैद्यकीय अधिकारी एम. बी. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली […]
इगतपुरीनामा न्यूज – नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचालित इगतपुरी येथील कला व वाणिज्य महाविद्यालयातर्फे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विशेष श्रमसंस्कार शिबीर फांगुळगव्हाण येथे संपन्न झाले. १९ ते २५ जानेवारी या कालावधीत आयोजित ह्या शिबीरात युथ फॉर माय भारत युथ फॉर डिजिटल लिटरसी या संकल्पनेवर आधारित विविध उपक्रम राबविण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा […]
इगतपुरीनामा न्यूज – सर्वत्र रक्ताचा तुटवडा असल्याने मोठी वाचू शकणाऱ्यांचा प्राण धोक्यात आलेला आहे. रक्ताचे संकलन होणे काळाची गरज असून यामुळे अनेकांचे प्राण वाचवण्यासाठी हातभार लागतो. केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष तथा केमिस्ट हृदयसम्राट जगन्नाथ शिंदे यांच्या अमृतमहोत्सवी ७५ व्या वाढदिवसानिमित्त राज्यभर ७५ हजार रक्त पिशव्या जमा करण्याचा कार्यक्रम आज संपन्न झाला. त्यानुसार नाशिक जिल्हा […]
इगतपुरीनामा न्यूज – रेझिंग डे अर्थात पोलीस स्थापना दिवसानिमित्त इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपले रक्तदान केले. पोलीस स्थापना दिवस आणि या दिवशी पोलिसांना ध्वज प्रदान करण्यात आल्याच्या निमित्ताने दरवर्षी जानेवारीचा पहिला आठवडा रेझिंग डे सप्ताह म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त वाडीवऱ्हे […]
इगतपुरीनामा न्यूज – जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रेरणेतून इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सदो सेवा केंद्र येथील कै. दत्तात्रय सहदेव ठमके वय ८४ यांचे त्यांच्या इच्छेनुसार मरणोत्तर देहदान करण्यात आले. नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या पुढाकारातून झालेले हे ७५ वे मरणोत्तर देहदान आहे.धामणगाव येथील एसएमबीटी वैद्यकीय महाविद्यालयाला कुटुंबियांनी कै. दत्तात्रय सहदेव ठमके यांचा देह सुपूर्द केला. […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यात आपल्या आदर्श आणि सेवाभावी कार्याने सुपरिचित असणारे कुमारशेठ चोरडिया यांची इगतपुरी तालुका केमिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी सार्थ निवड करण्यात आली आहे. मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी ही निवडीची घोषणा करून नियुक्तीपत्र दिले. यावेळी नाशिक जिल्हा मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश आहेर, उपाध्यक्ष गणेश निकम, अतुल आहेर, गोरख चौधरी, सुरेश […]
किरण घायदार : इगतपुरीनामा न्यूज : धावत्या रेल्वेत वा बसमध्ये प्रसुती कळा सुरू होऊन महिला प्रसूत झाल्याच्या अनेक घटना आपण वाचतो, ऐकतो. तशाच प्रकारची एक घटना आज बुधवारी दुपारी नाशिक ते नंदुरबार या एसटी बसमध्ये घडली. नाशिक नंदुरबार बस क्रमांक एमएच 40 वाय 5668 ह्या बसमध्ये सटाणा दरम्यान प्रवास करणाऱ्या गरोदर महिलेची प्रसूती झाल्याची माहिती […]
भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील घोटी येथील मातोश्री हॉस्पिटल म्हणजे दुर्मिळ अतिदुर्मिळ शस्त्रक्रिया आणि गंभीर आजारावर उपचार करणारे सर्वोत्तम रुग्णालय म्हणून जिल्हाभर मान्यता पावले आहे. हॉस्पिटलच्या संचालक डॉ. हेमलता चोरडिया, डॉ. जितेंद्र चोरडिया यांच्यातील सेवाभाव आणि जोखीम घेऊन लोकांना वाचवण्याचे त्यांचे कौशल्य वाखाणण्याजोगे आहे. आपले तज्ज्ञ, कुशल डॉक्टर आणि सहकाऱ्यांसह रुग्णांवर उपचाराची […]
इगतपुरीनामा न्यूज – गोंदे दुमाला येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे. जागतिक सल्लागार संतोष सांगळे व सहकारी यावेळी मार्गदर्शन करणार आहे. यामध्ये वजन वाढवणे, कमी करणे, जास्त एनर्जी स्त्रियांचे आजार, लहान मुलांच्या आहार मार्गदर्शन, पाचक आरोग्य योगा प्राणायाम व बांबू वर्क यावर सखोल असा मार्गदर्शन मिळेल. […]