अवकाळीने इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान : आचारसंहितेचा बाऊ न करता प्रशासनाने तात्काळ मदत द्यावी : पांडुरंग वारुंगसे

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यात यावर्षी चांगला पाऊस झाल्याने भात पीक दमदार आले आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून संततधारेसह मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे भातावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादन घटण्याची भीती शेतकरी वर्गाकडून व्यक्त करण्यात येत आहे. यातच शनिवारी सायंकाळी अवकाळी पावसाने थैमान घातल्याने शेतकऱ्यांची दिवाळी अडचणीत सापडली आहे. शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेल्या भात […]

एसएमबीटी हॉस्पिटल, साकुर फाटा गावांकडे जाणारी येणारी वाहतूक ठप्प : अस्वलीजवळ झाडे पडल्याने रस्ता बंद ; प्रशासन सुस्त

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील प्रमुख रस्ता असणाऱ्या अस्वली ते साकुर फाटा रस्त्यावर पावसामुळे ब्रिटिशकालीन वडाची झाडे पडण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. दोन तीन दिवसात अनेक झाडे पडली. त्यामुळे ह्या रस्त्यावरून वाहतूक बंद झाली असून शेतकऱ्यांना शेतीकडे जाणे अवघड झाले आहे. उत्तर महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असणाऱ्या एसएमबीटी रुग्णालयाकडे हा रस्ता जात असल्याने रुग्णवाहीका, डॉक्टर, विद्यार्थी यांना […]

रेल्वे पुलाखाली पाणी तुंबल्याने पाडळी देशमुखसह १२ वाड्या व शालेय विद्यार्थ्यांचा रस्ता बंद : रेल्वे यंत्रणेने उपाययोजना करण्याची मागणी

प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यात शनिवारपासुन सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे महामार्गानजीकच्या पाडळी देशमुख गावाकडे जाणाऱ्या रेल्वेपुलाखालील पाणी निघत नाही. त्यामुळे पाडळी देशमुख गावचा व पुढे जाणाऱ्या शेणवड खुर्द, गरुडेश्वर व १२ वाड्या तसेच पंचक्रोशीतील गावांसह मुकणे येथे शाळेत जाणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांचा संपर्क तुटण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. येथील रेल्वे पुलाच्या रुंदीकरणाचे काम […]

पुनर्वसित दरेवाडीचे त्रस्त ग्रामस्थ ९ ऑगस्टला आदिवासी दिनी भाम धरणात घेणार जलसमाधी : एल्गार कष्टकरी संघटनेतर्फे उपजिल्हाध्यक्ष गणपत गावंडा यांचा आक्रमक पवित्रा

इगतपुरीनामा न्यूज – सध्या सुरु असलेल्या पावसामुळे पुनर्वसित दरेवाडी येथील घरांमध्ये पाणी घुसले आहे. तात्पुरत्या स्वरूपात बाधित कुटुंबांना अन्य ठिकाणी स्थलांतर केले आहे. भाम धरणामुळे विस्थापित झालेल्या दरेवाडीचे पुनर्वसन नवीन जागेत गेल्या पाच वर्षांपूर्वी करण्यात आले. मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या नागरी सुविधा करण्यात आली नाही. ग्रामस्थ गेल्या पाच वर्षापासून सतत पुनर्वसन विभाग व पाटबंधारे […]

कसारा घाटात रेल्वे लाईनवर कोसळली दरड ; रेल्वेसेवा झाली सकाळपासून विस्कळीत

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी भागातील मुसळधार पावसामुळे इगतपुरी घाटात रेल्वे लाइनवर दरड कोसळल्याने अनेक रेल्वे गाड्या प्रभावित झाल्या आहे. पंचवटी एक्सप्रेस पास झाल्यानंतर काही वेळात हा प्रकार घडल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले. इगतपुरी भागात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरु आहे. रस्ते खराब झाल्याने व अनेक ठिकाणी पाणी साचल्याने नाशिकवरून मुंबईकडे जाण्यासाठी सात आठ तासाचा कालावधी लागतोय. यामुळे […]

भावली धरणाजवळ मोठी दरड कोसळतेय ; पर्यटकांनो सावधान

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यात पावसाची संततधार सुरूच असून तालुक्याचे विशेष आकर्षण असणाऱ्या भावली धरण भागात मोठी दरड कोसळली आहे. धरणे ओसंडून वाहत असल्याने पाणीपातळीत वाढ झाली आहे. यातच दरड कोसळल्याने त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे. पावसामुळे ह्या घटना सतत घडत असल्याने प्रशासन सतर्क झाले असले तरी प्रशासनाचा वेळकाढूपणा चांगलाच नजरेस आला आहे. इगतपुरी तालुक्यात […]

५ दिवसातच इगतपुरीचे तहसीलदार अभिजित बारवकर यांच्याकडून अवकाळीग्रस्त शेतकऱ्याला मिळाली ३७ हजार ५०० नुकसानभरपाई : सामाजिक कार्यकर्ते आत्माराम फोकणे यांच्या पाठपुराव्याला मिळाले यश

इगतपुरीनामा न्यूज – मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे घोटी खुर्द येथील शंकर यशवंत निसरड यांचे घर कोसळले होते. या घटनेत संसारोपयोगी साहित्य, अन्नधान्य आणि एका म्हशीचा मृत्यू झाला होता. इगतपुरीचे तहसीलदार अभिजीत बारवकर यांनी घटनास्थळी तातडीने भेट देऊन तलाठी, मंडळ अधिकारी यांना पंचनामे करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार आज शंकर यशवंत निसरड ह्या पीडित शेतकऱ्याला […]

सलगच्या अवकाळीने इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान : सरसकट विमा मंजूर करून नुकसान भरपाई द्या – इंदिरा काँग्रेसची तहसीलदारांकडे मागणी

प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यात सलग दोन दिवसांच्या अवकाळी पावसाने शेतात कापणी केलेल्या भाताचे व बागायती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. भिजलेल्या भाताला मोड फुटण्याची भीती व्यक्त होत आहे. शासनस्तरावर याची दखल घेऊन शेतकऱ्यांचा सरसकट पीकविमा मंजुर करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी इगतपुरी तालुका इंदिरा काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे. आमदार हिरामण […]

मुकणेच्या आवर्तनामुळे कुऱ्हेगावला भातपिकांचे नुकसान : शेतकऱ्यांना न्याय द्या अन्यथा धरणावर झोपा काढो आंदोलनाचा छावा क्रांतिवीर सेनेचे गोकुळ धोंगडे यांचा इशारा

लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील कुऱ्हेगाव येथील शेतकऱ्यांना पूर्व कल्पना न देताच मुकणे धरणाचे आवर्तन सोडले. यामुळे शेतकऱ्यांनी शेतात कापणी करून ठेवलेल्या भाताची मोठ्या प्रमाणात हानी झाल्याने शेतकरी संकटात आले आहेत. मुकणे धरणाचे शाखाधिकारी विजय ठाकूर यांच्यासह सहकाऱ्यांनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. मात्र शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन बोळवण केल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांविषयी […]

वादळी पावसाने घोटी खुर्द येथे घर पडले ; १ म्हैस ठार, अनेक शेळ्या जखमी, जीवितहानी नाही : पीडित शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्या – सामाजिक कार्यकर्ते आत्माराम फोकणे

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात घोटी खुर्द येथे अवकाळी वादळी पावसामुळे दगड मातीचे बांधकाम असलेले कौलारू घर पडल्याची घटना घडली आहे. या घटनेत दुधाळ म्हैस जागीच ठार झाली असून अनेक पाळीव शेळ्या गंभीर जखमी झाल्या. घरात उभ्या केलेली मोटारसायकल पडलेल्या घरात दाबली गेल्याने त्याचेही मोठे नुकसान झाले. घरातील अन्न धान्य, संसारोपयोगी साहित्याचे मोठे […]

error: Content is protected !!