टाकेदचे अत्याचार प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून नराधम मुख्याध्यापक आणि शिक्षकाला फाशी द्या – शेतकरी नेते नारायण राजे भोसले यांची आक्रमक मागणी

इगतपुरीनामा न्यूज – टाकेद बुद्रुक येथील माध्यमिक शाळेचा नराधम मुख्याध्यापक व शिक्षकाने सहावीतल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या घटनेने पूर्ण तालुका आणि जनमाणसे हादरून गेले आहेत. ह्या घृणास्पद घटनेने शिक्षण क्षेत्र आणि माणुसकीला मान खाली घालायला लागली आहे. अशा क्लेशदायक घटना पुन्हा पुन्हा घडू नये म्हणून हे जलदगती न्यायालयात चालवावे. कसून तपास करून दोन्हीही नराधम आरोपींना […]

इगतपुरी तालुका साहित्य मंडळाचे मानाचे पुरस्कार जाहीर ; १५ फेब्रुवारीला वाडीवऱ्हे येथे होणार वितरण

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुका साहित्य मंडळातर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांना प्रतिवर्षी पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. ही परंपरा कायम ठेवत यावर्षीच्या पुरस्कारांची घोषणा मंडळातर्फे करण्यात आली आहे . यावर्षी ‘जीवन गौरव’ पुरस्कार – नानासाहेब बोरस्ते यांना, ‘सर्वतीर्थ ‘पुरस्कार – ज्येष्ठ साहित्यिक उद्धव भयवाळ यांना तर ‘वारकरी भूषण ‘पुरस्कार- हभप अशोक महाराज धांडे यांना जाहीर करण्यात आला […]

टाकेद अनामिका लैंगिक अत्याचार – इगतपुरी शिक्षण विभागाचे चाललेय तरी काय ? : मद्यधुंद अधिकारी आणि शिक्षकांचे खाली डोके वरती पाय…!

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – आजचा दिवस तालुक्याच्या शिक्षण क्षेत्रासाठी अत्यंत काळाकुट्ट म्हणावा असा उगवला आहे. ज्यांना गुरू म्हटले जाते त्या शिक्षकानेच शाळेतील एक अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची घटना आज सकाळीच उघडकीस आली आहे. या एका घटनेने तालुक्याच्या शिक्षण विभागाच्या कारभाराचा पंचनामा चव्हाट्यावर मांडला आहे. आधीच आदिवासी समाज शिक्षणापासून वंचित राहिला आहे, ज्या थोड्याफार […]

मुख्याध्यापकाने केला शिक्षकाच्या मदतीने १३ वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार : २ जण अटक ; इगतपुरी तालुक्यात उसळली संतापाची लाट

इगतपुरीनामा न्यूज : इगतपुरी तालुक्यातील टाकेद बुद्रुक येथे शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. शाळेच्या मुख्याध्यापकानेच शिक्षकाच्या मदतीने १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे काल शुक्रवारी समोर आले आहे. घोटी पोलिसांना याबाबत माहिती समजताच रात्रीच मुख्याध्यापकासह शिक्षकाला अटक करण्यात आले आले आहे. भारतीय न्याय संहिता आणि बाल संरक्षण व अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा […]

नाशिकच्या जागतिक कृषी महोत्सवाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा नाशिक, दिंडोरी प्रणित शेतकरी उत्पादक कंपनीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक कृषी महोत्सवाचे उदघाटन कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी केले. यावेळी शेतकरी, मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते. कृषिमंत्री ॲड. कोकाटे यांनी विविध स्टॉलला भेट देऊन शेतकऱ्यांच्या उत्पादनाची माहिती घेतली. महोत्सवामध्ये  कृषी […]

जि. प. पं. स. आणि ग्रामपंचायतीच्या रखडलेल्या निवडणुका घ्याव्यात : राष्ट्रवादीचे युवा तालुकाध्यक्ष राहुल सहाणे यांची मागणी

इगतपुरीनामा न्यूज – लोकसभा विधानसभा निवडणुकांनंतर जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुका होणे अपेक्षित होते. ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासकीय राजवट असल्याने सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवणे आणि विकासकामे करण्यासाठी अडथळे येत आहेत. लोकशाही व्यवस्था टिकवण्यासाठी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुका व्हाव्यात अशी सामान्य नागरिकांची मागणी आहे. सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही […]

‘आत्मा’तर्फे ६ फेब्रुवारीपासून नाशिकला जागतिक कृषी महोत्सवाचे आयोजन : शेतकऱ्यांसह नागरिकांनी महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन

इगतपुरीनामा न्यूज – महाराष्ट्र शासन कृषि विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा ‘आत्मा’ नाशिक आणि दिंडोरी प्रणित शेतकरी उत्पादक कंपनीच्या संयुक्त विद्यमाने नाशिकच्या यूथ फेस्टिव्हल मैदानावर ६ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारीपर्यंत जागतिक कृषी महोत्सवाचव आयोजन करण्यात आले आहे. या कृषी महोत्सवात विनामूल्य प्रवेश असल्याने शेतकरी आणि नागरिकांनी या महोत्सवात मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा असे आवाहन कृषी […]

२ अल्पवयीन मुलींचे आढळले मृतदेह ; इगतपुरी तालुक्यातील घटना

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील कांचनगाव परिसरातील ठाकूरवाडी येथील २ अल्पवयीन बेपत्ता मुलींचे मृतदेह सापडले आहेत. शेणवड बुद्रुक जवळ एका विहिरीत दोघींचा मृतदेह आढळून आले आहे. दोघींचे वय १७ ते १८ वर्षाच्या आत असल्याचे समजते. याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी घोटी पोलिसांना तातडीने माहिती दिली. पोलिसांनी तत्परतेने घटनास्थळी दाखल होत तपासाला वेगाने सुरुवात केली आहे. शवविच्छेदन करण्यासाठी […]

घोटी येथे उद्यापासून शतकोत्तर रौप्य महोत्सवी भव्यदिव्य अखंड हरिनाम सप्ताह : जोग महाराज भजनी मठ आणि तालुक्यातील भाविकांकडून आयोजन

इगतपुरीनामा न्यूज – जगद्‌गुरु श्री तुकोबाराय यांचा सदेह वैकुंठगमनाचा त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवासह इगतपुरी येथे स्वानंदसुखनिवासी सद्गुरु श्री जोग महाराजांनी जगद्‌गुरु श्री तुकोबारायांच्या सद्गुरु अनुग्रहाच्या निमित्ताने माघ शुद्ध दशमीला सुरु केलेल्या नाम सप्ताहाचा यावर्षी शतकोत्तर रौप्य महोत्सव अर्थात १२५ वे वर्ष आहे. या दोन्ही महोत्सवाच्या निमित्ताने भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. घोटी कृषी […]

शेणवड बुद्रुक जिल्हा परिषद शाळेत बाल आनंद मेळावा उत्साहात

इगतपुरीनामा न्यूज – शेणवड बुद्रुक जिल्हा परिषद शाळेत बाल आनंद मेळावा संपन्न झाला. आज सकाळी ८ वाजेपासून  ह्या मेळाव्याला प्रारंभ झाला आहे. गावासह परिसरातील ग्रामस्थ, विद्यार्थ्यांचे पालक आदींनी उपस्थित राहून मेळाव्याचा आनंद लुटला. शाळेतील विद्यार्थ्यांनी भाजीपाला, खाण्याचे स्टॉल, वडापाव, पाणीपुरी, खाऊचे दुकान, चहा, रस, फळाचे स्टॉल, चायनीज, मन्चुरिअन स्टॉल लावले आहेत. भविष्यात विद्यार्थ्यांना व्यवसायाची आवड […]

error: Content is protected !!