बेलगाव कुऱ्हेच्या गुलाबाचा दिल्लीत बोलबाला : व्हॅलेंटाईन दिनी मिळवला विक्रमी बाजारभाव

लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील बेलगाव कुऱ्हेचे शेतकरी राजू बोराडे यांची अस्वली स्टेशन जवळ उत्कृष्ठ गुलाबांची पाच वर्षांपासून शेती आहे. यावर्षी १७ गुंठ्यात नवीन गुलाब वाणाची निवड करून गुलाब शेतीचा प्रयोग त्यांनी यशस्वी केला आहे. त्यांनी कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ न घेता स्वतःच्या बळावर गुलाबांची आधुनिक शेती यशस्वी केली आहे. व्हॅलेंटाईन डे […]

टाकेद विद्यार्थिनी अत्याचार प्रकरण – इगतपुरीत सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचा विराट मुक मोर्चा : सहावीच्या विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या मुख्याध्यापकासह शिक्षकाला फाशी देण्याची मागणी : लकीभाऊ जाधव यांच्या नेतृत्वाखाली झाला मूक मोर्चा

इगतपुरीनामा न्यूज – टाकेद बुद्रुक येथील विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी. पीडित मुलीच्या शिक्षणाचा खर्च व मान्य केलेली १५ लाखांची रक्कम तात्काळ मुलीच्या खात्यावर जमा करावी. ज्या दिवशी ही काळीमा फासणारी घटना घडली त्या घटनेच्या दिवशी फरार झालेल्या ६ शिक्षकांचे निलंबन करावे, यापुढे महिला आणि मुलींच्या बाबत तक्रार आल्यास त्यावर सत्वर लक्ष घालावे. […]

पावसाळ्याच्या आधी शिवरस्त्याच्या कामाला गती मिळावी : नांदूरवैद्य ग्रामस्थांचे तहसीलदार अभिजित बारवकर यांना निवेदन

इगतपुरीनामा न्यूज – पावसाळ्याच्या आधी नांदूरवैद्य येथील शिवरस्त्याच्या कामाला गती मिळून काम मार्गी लागावे, यादृष्टीने इगतपुरीचे तहसीलदार अभिजित बारवकर यांना नांदूरवैद्य ग्रामस्थांनी नुकतेच निवेदन दिले. नाशिक येथील संरक्षण विभागाच्या फिल्ड फायरिंग रेंज लगत जाणारा नांदुरवैद्य गाव ते अस्वली बेलगाव रस्त्याला मिळणारा, नकाशावरील परंतु वापरात नसलेल्या शिवरस्त्यासाठी नांदुरवैद्य ग्रामस्थ्यांनी केलेल्या प्रयत्नांना खासदार राजाभाऊ वाजे यांचे बळ […]

विद्यार्थिनींवरील अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी उपपाययोजना न केल्यास राज्यभर आंदोलन : अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे लकीभाऊ जाधव यांचा इशारा : संस्थेकडून पीडितेला १५ लाख आणि उचलणार शिक्षणाचा खर्च

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील टाकेद बुद्रुक येथील सहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर शाळेच्या मुख्याध्यापकाने शिक्षकाच्या मदतीने अत्याचार केल्याची घटना सर्वांना मान खाली घालायला लावणारी आहे. यामुळे पवित्र नाते अविश्वासात बदलले गेले असून यामध्ये सहभाग असणाऱ्यांवर कठोरात कठोर कठोर कारवाई केली पाहिजे. संपूर्ण तालुक्यातील जनतेला आणि शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलींना सुरक्षितता दाखवणे गरजेचे आहे. या प्रकरणी अत्याचारात […]

इगतपुरीचा शिक्षण विभाग तालुक्यातील धास्तावलेल्या विद्यार्थिनी आणि पालकांना कधी आधार देणार? : वंचित बहुजन आघाडीचा संतप्त सवाल : शिक्षणमंत्र्याच्या निवासस्थानी आक्रोश आंदोलन करण्याचा इशारा

लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – टाकेद बुद्रुकच्या अल्पवयीन शाळकरी मुलीवर  मुख्याध्यापक व शिक्षकाने अत्याचाराच्या घटनेमुळे तालुकाभरातील विद्यार्थिनी आणि महिला पालक अत्यंत घाबरून गेल्या आहेत. पोटासाठी कामावर जावे किंवा शेतमजुरी करावी की मुलींच्या सुरक्षिततेची चिंता करावी अशी द्विधावस्था वाढली आहे. महिलांमध्ये आणि सोशल मिडीयामध्ये महिला आपली भीती व्यक्त करताहेत. एवढी भयानक घटना घडून ऐन परीक्षा […]

शिक्षक संघटना सरसावल्या ; टाकेद प्रकरणातील गुन्हेगारांना कठोर शिक्षेची निवेदनाद्वारे मागणी

इगतपुरीनामा न्यूज – टाकेद बुद्रुक ता. इगतपुरी येथे झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा इगतपुरी तालुक्यातील सर्व शिक्षक संघटनांच्या वतीने निषेध करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टावर चालवण्यात यावे. संबंधित नराधमांना अधिकाधिक कठोर शिक्षा करावी अशी सर्व शिक्षक संघटनांची मागणी आहे. त्याबाबतचे निवेदन सर्व शिक्षक संघटनांच्या वतीने इगतपुरीचे तहसीलदार, गटविकास अधिकारी व […]

काय सांगता ? – टाकेदच्या पीडित विद्यार्थिनीचे “बदलापूर” प्रकरणाशी कनेक्शन ? : “बिचारी” विद्यार्थिनी फुफाट्यातून पडली अत्याचाराच्या आगीत : एल्गार कष्टकरी संघटनेच्या महिलांकडून पीडितेशी चर्चा

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील टाकेद बुद्रुक येथील सहावीच्या विद्यार्थिनीवर शाळेच्या नराधम मुख्याध्यापकाने शिक्षकाच्या मदतीने अत्याचार घडल्याने सर्वत्र संतापाचे वातावरण आहे. १३ वर्षीय पीडित विद्यार्थिनीचे ‘बदलापूर” येथे घडलेल्या घृणास्पद घटनेशी कनेक्शन असल्याचे समजले आहे. पीडित विद्यार्थिनी बदलापूर येथील शाळा सोडून टाकेद बुद्रुक शाळेत जुनपासून शिकत आहे. पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबाशी एल्गार […]

टाकेद विद्यार्थिनी अत्याचार प्रकरण – टाकेदच्या थातूरमातुर कार्यक्रमांत येणाऱ्या इगतपुरीच्या अधिकाऱ्यांकडून अद्यापही शाळेसह पीडितेच्या कुटुंबाला भेट नाही : टाकेद परिसरातील पालकांची संतप्त भूमिका ; मुख्याध्यापक, शिक्षकाला मिळाली कोठडी

शहाबाज शेख : इगतपुरीनामा न्यूज – संपूर्ण इगतपुरी तालुक्याला हादरवून सोडणाऱ्या टाकेद येथील सहावीच्या विद्यार्थिनी अत्याचार प्रकरणातील आरोपी मुख्याध्यापक तुकाराम साबळे, शिक्षक गोरक्षनाथ जोशी या दोघांना पोलिसांनी रविवारी इगतपुरी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोघांनाही १३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यापुर्वीही या परिसरात अनेकवेळा अशा प्रकारच्या घटना काही विद्यार्थीनीबरोबर घडल्या आहेत. परंतु दबाव आणून त्या […]

टाकेद अत्याचार प्रकरण – इगतपुरी तालुक्यातील सर्व शिक्षकांची, अधिकाऱ्यांची तातडीने पोलीस चारित्र्यपडताळणी करा : याशिवाय वेतन अदा न करण्याची राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पांडुरंग वारुंगसे यांची मागणी

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील टाकेदच्या विद्यार्थिनीवरील मुख्याध्यापक आणि शिक्षकाच्या उघडकीस आलेल्या प्रकरणामुळे इगतपुरी तालुका राज्यात बदनाम झाला आहे. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पर्यवेक्षिय कामकाजात अक्षम्य हलगर्जीचा हा दुष्परिणाम आहे. इगतपुरी तालुक्याचे निसगसौंदर्य असणाऱ्या आणि महामार्गावरील हॉटेल फार्महाऊसवर अधिकारी आणि शिक्षक यांच्या ओल्या सुक्या पार्ट्या होत असल्याच्या गंभीर तक्रारी आहेत. यासह संबंधित काही अधिकारी आणि शिक्षक […]

टाकेदचे अत्याचार प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून नराधम मुख्याध्यापक आणि शिक्षकाला फाशी द्या – शेतकरी नेते नारायण राजे भोसले यांची आक्रमक मागणी

इगतपुरीनामा न्यूज – टाकेद बुद्रुक येथील माध्यमिक शाळेचा नराधम मुख्याध्यापक व शिक्षकाने सहावीतल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या घटनेने पूर्ण तालुका आणि जनमाणसे हादरून गेले आहेत. ह्या घृणास्पद घटनेने शिक्षण क्षेत्र आणि माणुसकीला मान खाली घालायला लागली आहे. अशा क्लेशदायक घटना पुन्हा पुन्हा घडू नये म्हणून हे जलदगती न्यायालयात चालवावे. कसून तपास करून दोन्हीही नराधम आरोपींना […]

error: Content is protected !!