
इगतपुरीनामा न्यूज – उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांची सिन्नर दौऱ्यात माजी आमदार शिवराम झोले यांचे सुपुत्र युवा नेते बाळासाहेब उर्फ जयप्रकाश झोले यांनी भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष डाॅ.श्रीराम लहामटे यांनी अजित दादांना बाळासाहेब झोले यांना उमेदवारी देण्यात यावी, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सदर जागा सोडण्यात यावी अशी मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हा पदाधिकारी यावेळी हजर होते. ह्या सर्वांनी अजित पवार यांच्याकडे बाळासाहेब झोले यांना इगतपुरीची उमेदवारी देण्यात यावी अशी आग्रही मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला इगतपुरीची जागा सोडल्यास आपण यशस्वी होऊ असे यावेळी सांगण्यात आले. त्यास प्रतिसाद देत इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधासभेसाठी कामाला लागा असा शब्द चर्चेत ना. अजित दादा पवार यांनी दिला. यावेळी बाळासाहेब झोले यांनी अजित दादांसोबत १९९६ मध्ये काढलेले छायाचित्र दाखविल्यानंतर अजित दादा भावुक झाले. याप्रसंगी आदिवासी सेलचे डॉ. श्रीराम लहामटे, इगतपुरी तालुकाध्यक्ष पांडुरंग वारुंगसे, शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील, आमदार कोकाटे समर्थक दौलत बांबळे, जिल्हा उपाध्यक्ष भोरु काठे, आदिवासी सेलचे तालुकाध्यक्ष अमोल दिवे, सामाजिक कार्यकर्ते तुकाराम भगत, आनंदा कोरडे, जिल्हा उपाध्यक्ष नागेश लहामटे, सिन्नर तालुकाध्यक्ष शरद लहांगे, भाऊसाहेब गायकवाड, गणेश जगताप, विजय बांबळे, पंडित गायकर, बाळू कचरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.