टाकेद परिसरात बिबट्या जेरबंद करण्यात इगतपुरी वन विभागाला यश

शहाबाज शेख : इगतपुरीनामा न्यूज, दि. 16

इगतपुरी तालुक्यातील राहुलनगर येथे बिबट्याला जेरबंद करण्यात इगतपुरी वन विभागाला यश आले आहे. राहुलनगर येथील दुर्गा देवी टेकडी येथे हा बिबट्या ताब्यात घेण्यात आला आहे. वन अधिकाऱ्यांनी इगतपुरी येथे बिबट्याला नेण्यात आले असल्याचे सांगितले. इगतपुरीचे प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस, वन परिमंडळ अधिकारी भाऊसाहेब राव यांच्या नेतृत्वाखाली वनरक्षक स्वाती लोखंडे, गोरख बागुल, फैजअली सैय्यद, माऊली तसेच वनमजुर दशरथ निर्गुडे, गोविंद बेंडकोळी, भोरु धोंगडे, धोंडीराम पेढेकर, पूनाजी कोरडे, अर्जुन मदगे यांनी ह्या मोहिमेत सहभाग घेतला. ताब्यात आलेल्या बिबट्याला ट्रॅक्टरद्वारे इगतपुरी वनविभाग ऑफिस येथे नेण्यात आले आहे. इगतपुरी तालुक्यात विविध गावांमध्ये बिबट्या असून त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. आजच्या घटनेमुळे ग्रामस्थांनी वन खात्याचे आभार मानले आहेत.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!