
इगतपुरीनामा न्यूज – वनपरिक्षेत्र हद्धीमध्ये जंगलाला आग लागल्यास मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असते. यामध्ये वन्य जीवांचा अंत होऊन त्यांचा अधिवास धोक्यात येतो. यामुळे लागणाऱ्या आगी विझवण्याचे मोठे कौशल्य असते. यालाच प्राधान्य देऊन इगतपुरी वन विभागाने आग विझवण्याबाबत आपल्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित केले आहे. यासह नागरी क्षेत्रात घुसलेला कोणताही वन्यप्राणी रेस्क्यू कसा करायचा याचेही प्रशिक्षण सर्वांना देण्यात आले आहे. इगतपुरीचे वन परिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली घोटी येथील वन परिमंडळ कार्यालयात प्रात्यक्षिके घेण्यात आली. यावेळी वन्यजीव नाशिक पश्चिम विभागाचे उपवनसंरक्षक पंकज गर्ग, सहाय्यक उपवनसंरक्षक अनिल पवार यांनी दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचा अवलंब करण्यात आला. वनपरिमंडळ अधिकारी भाऊसाहेब राव, पोपट डांगे, सचिन दिवाणे, सुरेश चौधरी, मुज्जू शेख, वनरक्षक सोमनाथ जाधव, फैजअली सय्यद, गौरव गांगुर्डे, विठ्ठल गावंडे, शरद थोरात, चिंतामण गाडर, कैलास पोटींदे, साळुंखे, राहुल घाटेसाव, गोरख बागुल, मंगल धादवड, मंदा पवार, मनिषा सोनवणे, कावेरी पाटील, मालती पाडवी, स्वाती लोखंडे आदींनी प्रशिक्षण आणि प्रात्याक्षिकांत सहभाग नोंदवला.