इगतपुरीनामा न्यूज, दि. २
इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव मोर सोसायटीचे माजी चेअरमन पंढरीनाथ काळे यांच्या सातपूर अशोकनगर येथील बंगल्याच्या बाल्कनीत बिबट्या आढळून आला आहे. पंढरीनाथ काळे यांच्या ‘शिवतीर्थ’ बंगल्याच्या बाल्कनीत आज सकाळी बिबट्या दिसल्याने पंढरीनाथ काळे यांनी सांगितले. यामुळे परिसरात घबराट पसरली आहे. वनविभागाचे पथक दाखल झाले असून अडीच तासांपासून रेस्क्यूसाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. बिबट्या असलेल्या ठिकाणाजवळ पहाटेपासून अनेकदा गेलो. मात्र परिसरातील नागरिकांनी बिबट्याने ठाण मांडल्याचे सांगितल्यामुळे हा प्रकार माझ्या ध्यानात आला. आज शनिवार असल्याने नातवंडे शाळेत जाण्यासाठी बाहेर पडले नाहीत. त्यामुळे मोठा धोका टळला असल्याचे पंढरीनाथ काळे म्हणाले. दरम्यान श्री. काळे यांच्या गावीही बिबट्या दिसत असल्याने याबाबत ते नेहमी तक्रारी करत असतात. आज त्यांच्याच घरी बिबट्या दिसल्याने इगतपुरी तालुक्यात चर्चा रंगली आहे.
नाशिकमध्ये दररोज कोणत्या ना कोणत्या नागरी वसाहतीच्या भागात बिबट्या आढळून येतांना दिसत असतांनाच आज सातपूरच्या वर्दळीच्या ठिकाणी बिबट्या दिसल्याने पुन्हा नागरिकांची धडधड वाढली आहे. वारंवार होणाऱ्या बिबट्याच्या दर्शनामुळे नागरिक भयभीत झाले असून वावरतांना काळजी घेण्याची आवाहन पंढरीनाथ काळे यांनी सांगितले. बंगल्याची सुरक्षा भीत जवळपास ७ फुटांच्या भिंतीवरून बिबट्या उडी मारून बाथरूमच्या पोटमाळ्यावर बाल्कनीमध्ये बिबटयाने कब्जा करून ठाण मांडले. एकंदरीत आज शनिवार सुटीचा वार आहे. शिवाय पाऊस देखील चालू असल्याने वर्दळ कमी आहे. घरातील व गल्लीतील अनेक लहान मुले रस्त्यावर खेळत असतात. आज जर मुले खेळत असते आणि बिबट्याने चिमुरड्यांवर हल्ला केला असता तर मोठी दुर्घटना घडली असती असेही श्री. काळे यांनी सांगितले.
रोजच बिबट्याची बातमी ऐकायला येत असतानाच आमचे शेजारी पंढरीनाथ काळे यांच्या पोटमळ्यावर बिबट्या दिसल्याचे समजले तात्काळ पोलीस कर्मचारी व वनविभागाचे अधिकारी रेस्क्यूसाठी हजर झाले. रेस्क्यू टीम तयारी करत आहे. परिसरातील अनेक युवक व नागरिक परिस्थितीवर लक्ष ठेवून असून नागरी वर्दळ थांबवली आहे.
- योगेश शेवरे, माजी सभापती तथा माजी नगरसेवक