इगतपुरीनामा न्यूज, दि. 18
मुंबई आग्रा महामार्गावर वाडीवऱ्हे पासून पुढे आणि व्हिटीसी फाट्याच्या आधी एका बिबट्याला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तो जखमी झाला आहे. ही घटना आज रात्री सात वाजेच्या सुमाराला घडली. बिबट्याच्या पायांना जोरात मार लागल्याने तो जखमी आहे. परिणामी बिबट्याला हालचाल करता येत नाही. महामार्गावर दोन्ही बाजूच्या वाहनधारकांनी जखमी बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी केली आहे. इगतपुरीचे प्रादेशिक वनपरीक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिमंडळ अधिकारी शैलेश झुटे यांनी जखमी बिबट्याला तातडीने ताब्यात घेण्याची कार्यवाही केली आहे. बिबट्याला वैद्यकीय उपचारासाठी पशुवैद्यकीय दवाखान्यात नेणार आहे. रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली आहे.