गोंदे दुमाला एमआयडीसीत महामार्गावर बिबट्या ठार : रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाने उडवले ; कामगारांमध्ये पसरली घबराट

इगतपुरीनामा न्यूज, दि. १८

मुंबई आग्रा महामार्गावरील गोंदे दुमाला एमआयडीसी भागात रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्याला अज्ञात वाहनाने उडवले आहे. ह्या अपघातात बिबट्या जागीच ठार झाला आहे. आज रात्री ११ च्या सुमाराला ही घटना घडली आहे. लिअर कंपनीच्या परिसरातून रस्ता ओलांडत असतांना बिबट्याला वाहनाने धडक दिल्याने बिबट्या ठार झाला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. इगतपुरीचे वन परिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले आहेत.  दरम्यान महामार्गावर विविध कंपन्यांमध्ये रात्रीच्या वेळी कामावर जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांमध्ये बिबट्याची भीती पसरली आहे. अद्यापही काही बिबटे असल्याची शक्यता गृहीत धरून वन विभागाने कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!