गावात लावणार १ लाखांची वड आणि पिंपळाची झाडे : गोरख बोडके यांचा प्रवास आता “रुग्णमित्र ते वृक्षमित्र”

नव्या गावाची उभारणी करूया विकसित गाव बनवूया इगतपुरीनामा न्यूज, दि. ६ काही वर्षांपुर्वी अतिदुर्लक्षित आणि विनोदाचा विषय म्हणून इगतपुरी तालुक्यातील मोडाळे गाव ओळखले जात होते. ह्या गावात मूलभूत सुविधांच्या योजनांसह कुणाच्या स्वप्नात कधीही न आलेला शाश्वत विकास आता पाहायला मिळत आहे. गावावर कुटुंबवत्सलतेने जीवापाड प्रेम करणारा एखादा सामान्य माणूस गावकऱ्यांची मान गर्वाने उंचावू शकतो हे […]

लेह लडाखच्या भूमीत इगतपुरी तालुक्यातील तरुणांकडून “दि. बा. पाटील” यांचा जयजयकार

इगतपुरीनामा न्यूज, दि. ६ भारतातील पर्यटनाचे आकर्षक केंद्रबिंदु लेह लडाख येथे एकत्र येत इगतपुरी तालुक्यातील तरुणांनी दि. बा. पाटील ह्यांच्या नावाचा बॅनर दाखवत त्यांच्या नावाचा जयघोष केला. लेह लडाखच्या कडे कपारीमध्ये दि. बा. यांच्या नावाचा आवाज आसमंतात घुमला. सध्या नवी मुंबई विमानतळाच्या नामांतरावरुन वातावरण पेटले आहे. महाराष्ट्रात सत्ताधारी आणि स्थानिक ह्यांच्यातला वाद आता टोकाला पोहोचला […]

जिल्ह्यात सर्वप्रथम ओहरफ्लो भावली धरणाचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते जलपूजन

वाल्मीक गवांदे, इगतपुरीनामा न्यूज, दि. २९ इगतपुरी तालुक्याची जलवाहिनी समजल्या जाणाऱ्या भावली धरणासाठी तालुक्यातील बांधवांनी मोठा त्याग केला आहे. त्यांचे हक्काचे पाणी केवळ तालुकावासीयांच मिळेल. त्यामुळे शहापूरला भावली धरणाचे पाणी जाऊच देणार नाही असा खणखणीत इशारा विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी भावली येथे जलपूजन करताना दिला. तालुक्याला लाभलेले निसर्गाचे वरदानच म्हणावे असे, दाटधुके, धबधबे, मुसळदार […]

कवितांचा मळा : आला महापूर

सौ. माधुरी पाटील शेवाळेजिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोडाळेसंवाद : ७५८८४९३२६० आला काळ, महापूरजशी जगबुडी झाली बुडे काळोख्या रातिलाघरे-दारे पाण्याखाली..!!१!! घळा पडल्या शेतास गेल्या वाहूनिया वाटा डोळ्या समोर दिसताजशा त्सुनामीच्या लाटा..!!२!! सोने-नाणे,भांडी कुंडीचारा पाणी गुरे-ढोरेआयुष्याच्या संसाराचेरातोरात गेले सारे..!!३!! अन्न खाऊची पाकिटेमायेपोटी पाठवली माणसाला वाचविण्यामाणुसकी कामी आली..!!४!! गेला संसार वाहूनअसा सहज पाण्यात कसा करू उभा आतादूर जाऊन काट्यात…!!५!! पुरे तुझे देवा आताशांत […]

व्हिडिओ आणि छायाचित्र : दमणगंगेने परिधान केला “नेकलेस”

खरपडी – खामशेत : मान्सून जोराने सक्रिय झालेला असून पेठ- हरसूल-त्र्यंबकेश्वरच्या पट्यात अतिवृष्टी सुरू आहे. त्यामुळे दमणगंगा नदीला पूर येऊन दुथडी भरून वाहत आहे. यातच निसर्गाने दमणगंगेला नेकलेस परिधान केल्याचं मनमोहक दृश्य खरपडी जवळ बघावयास मिळत आहे. छायाचित्र आणि व्हिडिओ : राहुल बोरसे, हरसूल ) व्हिडिओ पहा

नाव विकासाचं, नख निसर्गाला

नाशिकजवळील त्र्यंबकेश्वरचा ब्रम्हगिरी पर्वत काही भूमाफियांनी पोखरुन काढल्याने डोंगरतोड मुद्दा राज्यभरात पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्यामित्ताने राज्याच्या आणि देशाच्याही पर्यावरणावर दुरगामी परिणाम करणार्या या गंभीर विषयावर धोक्याची सूचना देणारा लेख.. साडे तीनशे वर्षांपूर्वी “वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे” हा थेट निसर्गासोबतची सोयरीक सांगणारा जगद्गुरू तुकोबारायांचा जीवनमंत्र आम्ही विसरून गेलोय. त्याऐवजी “विकास” नामक राक्षसाच्या घशात […]

निसर्गाच्या हिरवळीने पर्यटक मोहित ; अनलॉकनंतर तरुणाईच्या फोटोसेशनला उधाण

निलेश काळे, इगतपुरीनामा न्यूज, दि. ११ राज्य सरकारने अलीकडेच अनेक निर्बध शिथिल केले आहेत. अनेक दिवसांपासून असलेले लॉकडाऊन व कडक निर्बंध आदींनी आलेली मरगळ झटकण्यासाठी तरुणीने सुवर्णमध्य साधून निसर्गाच्या सानिध्यात मन रमवून निसर्गाशी एकरूप होवू पाहत आहे. रोहिणी नक्षत्रानंतर पडणारे मान्सूनपूर्व त्याचप्रमाणे चक्रीवादळामुळे जोरदार पाऊस बरसल्याने सगळीकडे हिरवळ तयार झाली आहे. शेतकऱ्यांनी देखील मशागतीची जोरदार […]

ब्रह्मगिरीच्या बचावासाठी कृती समिती सज्ज : उत्खननाला बसणार आळा

“दृष्टी पडता ब्रम्हगिरी । त्यासी नाही यमपुरी”“नामा म्हणे प्रदक्षिणा । त्याचे पुण्या नाही गणना सुनिल बोडके, इगतपुरीनामा न्यूज, दि. ३ आद्य ज्योतिर्लिंग असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर, संत निवृत्तीनाथ महाराज यांच्यावर सावली धरणाऱ्या ब्रम्हगिरीचे महत्व अनन्यसाधारण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या किल्ले ब्रह्मगिरीला जमीन माफियांनी पोखरून काढायचे काम सुरू केले होते. मात्र पर्यावरण प्रेमींच्या […]

अंजनेरी ते मुळेगाव रस्त्यासाठी केंद्राकडून 5 कोटींचा निधी ; खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नांनी भक्तांना हनुमान पावला !

इगतपुरीनामा न्यूज, दि. 28 ( ज्ञानेश्वर महाले, त्र्यंबकेश्वर ) अंजनेरी-मुळेगाव-जातेगाव-राजुर बहुला-गौळाणे-विल्होळी रोड ( एम. डी. आर.-१९ ) या रस्त्याचा नुतनीकरणासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. केंद्रीय रस्ते व दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी नुकतेच अंजनेरी-मुळेगाव-जातेगाव-राजुर बहुला-गौळाणे-विल्होळी या रस्त्याच्या दुरुस्तीसह नुतनीकरणासाठी तब्बल ४.८५ कोटींचा निधी मंजूर केल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.मंगळवारी […]

भैरवनाथ महाराज यात्रा सलग दुसऱ्या वर्षीही रद्द ; शासन निर्णयाला पिंपळगाव मोर ग्रामस्थांचा प्रतिसाद

इगतपुरीनामा न्यूज, दि. 25 ( निलेश काळे, पिंपळगाव मोर )कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव मोर येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज यात्रा सलग दुसऱ्या वर्षीही ग्रामस्थांनी एकमुखाने निर्णय घेवून रद्द केली. सालाबादप्रमाणे होणारी नियोजित यात्रा २३ ते २५ एप्रिल पर्यंत होणार होती.पहिल्या दिवशी जागरण, दुसऱ्या दिवशी मिरवणूक यात्रा तर तिसऱ्या दिवशी कुस्त्यांची विराट दंगल होऊन […]

error: Content is protected !!