लेह लडाखच्या भूमीत इगतपुरी तालुक्यातील तरुणांकडून “दि. बा. पाटील” यांचा जयजयकार

इगतपुरीनामा न्यूज, दि. ६

भारतातील पर्यटनाचे आकर्षक केंद्रबिंदु लेह लडाख येथे एकत्र येत इगतपुरी तालुक्यातील तरुणांनी दि. बा. पाटील ह्यांच्या नावाचा बॅनर दाखवत त्यांच्या नावाचा जयघोष केला. लेह लडाखच्या कडे कपारीमध्ये दि. बा. यांच्या नावाचा आवाज आसमंतात घुमला. सध्या नवी मुंबई विमानतळाच्या नामांतरावरुन वातावरण पेटले आहे. महाराष्ट्रात सत्ताधारी आणि स्थानिक ह्यांच्यातला वाद आता टोकाला पोहोचला आहे. सिडको भवनाला घेराव असो की महामार्गावरचे आंदोलन ह्यातून सगळीकडे स्थानिक जनता आक्रमक होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत इगतपुरी तालुक्यातुन सुद्धा दि. बा. पाटील यांच्या नावाचा आग्रह होत आहे. ह्या मागणीचा आवाज सर्वांसमोर जाण्यासाठी लेह लडाखमध्ये तरुणाईने आगळेवेगळे पाऊल उचलले. इगतपुरी तालुक्यातून ह्या तरुणांचे कौतुक सुरू आहे.

भारतातीलच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पर्यटकांचा जिथे राबता आहे अशा मोक्याच्या ठिकाणी लेह लडाख येथील डोंगर दऱ्यांमध्ये जाऊन इगतपुरीच्या तरुणांनी दि. बा. पाटील यांच्या नावाला समर्थन देणारा बॅनर उंचावत दि. बा. पाटील यांच्या नावाचा जोरदार जयघोष केला. या मोहिमेत इगतपुरी तालुक्यातील नामवंत लोकांचा सहभाग आहे. अनेकांच्या मदतीला धावून जाणारे हे सर्व तरुण सदैव समाजाच्या मागे उभे राहणारे आहेत. नेहमीच मदतीला धावून जाणारे हे तरुण शक्य त्या सर्वच पद्धतीने समाज विकासाचा ध्यास घेऊन समाजकार्यासाठी सतत अग्रेसर असतात. ह्या तरुणांनी लेह लडाख येथे जाऊन नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे ही मागणी हिरीरीने देशासमोर मांडत महाराष्ट्र सरकारचे लक्ष वेधले असल्याचे खरेदी विक्री संघाचे चेअरमन ज्ञानेश्वर लहाने यांनी सांगितले.

ह्या गौरवशाली उपक्रमात इगतपुरी तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन ज्ञानेश्वर लहाने, पीके ग्रुपचे संस्थापक प्रशांत कडू, विठ्ठल लंगडे, माणिकखांबचे माजी सरपंच तथा सरपंच परिषदेचे तालुकाध्यक्ष हरिश्चंद्र चव्हाण, शंकर भगत, सदानंद आडोळे, दशरथ भागडे, योगेश भागडे, प्रवीण म्हसणे, अमोल भागडे, नंदू कडू, नामदेव भागडे, अनिल चव्हाण, प्रकाश आडोळे, भाऊ भगत, रोमीत चव्हाण, दर्शन कडू, दिलीप चव्हाण आदी तरुण सहभागी झालेले आहेत.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!