जिल्ह्यात सर्वप्रथम ओहरफ्लो भावली धरणाचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते जलपूजन

वाल्मीक गवांदे, इगतपुरीनामा न्यूज, दि. २९

इगतपुरी तालुक्याची जलवाहिनी समजल्या जाणाऱ्या भावली धरणासाठी तालुक्यातील बांधवांनी मोठा त्याग केला आहे. त्यांचे हक्काचे पाणी केवळ तालुकावासीयांच मिळेल. त्यामुळे शहापूरला भावली धरणाचे पाणी जाऊच देणार नाही असा खणखणीत इशारा विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी भावली येथे जलपूजन करताना दिला. तालुक्याला लाभलेले निसर्गाचे वरदानच म्हणावे असे, दाटधुके, धबधबे, मुसळदार पावसातच महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते आज जलपुजन करण्यात आले. 

तालुक्यातील पहिलेच भावली धरण चार दिवसांपूर्वी ओहरफ्लो झाले असून आज विधानसभा उपाध्यक्ष ना. नरहरी झिरवळ व आमदार हिरामण खोसकर यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. त्याप्रसंगी ते पुढे म्हणाले की, गतवर्षी भावली येथील पर्यटनासाठी पाच कोटी रुपये मंजूर झाले असून कोरोना महामारीत राज्य सरकारला अनेक अडचणी आल्या आहेत. त्यामुळे तो निधी आगामी काळात माझ्या माध्यमातून आमदार हिरामण खोसकर यांच्या पाठपुराव्यातुन पर्यटनमंत्री यांची भेट घेऊन भावली धरणासाठी पाच कोटी रुपये निधी मंजूर करण्यासाठी मी प्रयत्नशील राहील.

यावेळी आमदार खोसकर म्हणाले की, भावली धरण परिसरातील नयनरम्य दृश्य, कोसळणारे धबधबे, धुक्याची चादर, ढगांचे कडे व कोसळणारा पाऊस येथील हा येथील निसर्गरम्य परीसर आहे. यामुळे इथे पर्यटन विकसित करण्यासाठी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन मोठ्या प्रमाणात निधी आणण्यासाठी प्रयत्नशील राहील. तसेच तालुक्यातील धरणातून शेती व पिण्याच्या पाण्याला प्राधान्य दिले जाईल अशी ग्वाही आमदार खोसकर यांनी यावेळी दिली.

यावेळी तहसीलदार परमेश्वर कासुळे, काँग्रेस नेते संदीप गुळवे, माजी आमदार शिवराम झोले, माजी जि. प. सदस्य गोरख बोडके, जनार्दन माळी, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लहाने, काँग्रेस तालुकाध्यक्ष रामदास धांडे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष बाळासाहेब गाढवे, अनिता घारे, भरत आराटे, किरण मुसळे, हरिश्चंद्र  चव्हाण, पिके ग्रुपचे अध्यक्ष प्रशांत कडू, भाऊराव भागडे, पोपटराव भागडे, अरुण गायकर, कैलास घारे, वसीम सय्यद, महेश शिरोळे, नारायण वळकंदे यांच्यासह जलसंपदा विभागाच्या अधिक्षक अभियंता अलका अहिरराव, कार्यकारी अभियंता सागर शिंदे आदी उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!