राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते नाना पाटील यांना महाराष्ट्र शासनाचा शेतीमित्र पुरस्कार प्रदान

इगतपुरीनामा न्यूज – महाराष्ट्र शासनाचा सन २०२१ चा शेतीमित्र पुरस्कार चाळीसगाव दडपिंप्री येथील नाना भाऊसिंग पाटील यांना प्रदान करण्यात आला. मुंबई येथे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते १ लाख २० हजार रुपये पारितोषिक व सन्मानपत्र सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत […]

मोडाळे ग्रामपंचायतीला माझी वसुंधरा अभियानात राज्य पातळीवर प्रथम क्रमांकाचे १ कोटी ५० लाखांचे पारितोषिक घोषित

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील मोडाळे ग्रामपंचायतीला माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत राज्यस्तरावरील प्रथम क्रमांकाचे १ कोटी आणि अन्य कामगिरीसाठी ५० लाख असे १ कोटी ५० लाखांचे पारितोषिक घोषित करण्यात आले आहे. राज्य शासनाने आज मोडाळे ग्रामपंचायतीसह बक्षीसपात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नावाची घोषणा केली. १५०० ते २५०० लोकसंख्या गटात मोडाळे गावाची उच्चत्तम कामगिरी बक्षीसपात्र ठरली. […]

घोटी बाजार समितीच्या उपसभापतीपदी संपत वाजे बिनविरोध विराजमान

इगतपुरीनामा न्यूज – नाशिक जिल्ह्यातील महत्वाच्या घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी संपत किसन वाजे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीचे सर्व स्तरात स्वागत होऊन त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. घोटी कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात उपसभापती निवडीसाठी संचालकांची सभा आज पार पडली. सहाय्यक निबंधक सहकारी संस्था तथा निवडणूक अधिकारी म्हणून अर्चना सैंदाणे यांनी […]

गुन्हेगारांचे कर्दनकाळ, सच्चे लोकसेवक तथा एलसीबीचे पोलीस अधिकारी राजू सुर्वे यांना राष्ट्रपती पुरस्कार घोषित

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – धकाधकीच्या काळात, स्वतेजाने आपल्यातील माणुसकीचे दर्शन क्षणाक्षणाला घडवणारा, गुन्हेगारांचा कर्दनकाळ, लोकांचा सखा, लोकांना कायद्याचे राज्य देण्यासाठी कटिबद्ध असणारा खरा लोकसेवक, “समुद्रातील अनमोल मोती” म्हणजे नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हा शाखेचे कर्तव्यकठोर पोलीस निरीक्षक आदरणीय राजू सुर्वे साहेब. त्यांच्या अभूतपूर्व कार्याची दखल घेऊन त्यांना भारत देशाचा अमूल्य असा राष्ट्रपती पुरस्कार घोषित […]

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना विधानसभा मतदारसंघ समितीच्या अध्यक्षपदी आमदार हिरामण खोसकर : सदस्यपदी रवींद्र भोये, पल्लवी शिंदे यांची पालकमंत्र्यांकडून निवड

इगतपुरीनामा न्यूज – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे संनियंत्रण व आढावा घेण्यासाठी इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदार संघनिहाय समिती गठीत करण्यात आली आहे. ह्या समितीच्या अध्यक्षपदी इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर यांची निवड करण्यात आली आहे. नाशिकचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. दादा भुसे यांनी पत्राद्वारे निवडीची घोषणा केली आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय ह्या समितीमध्ये […]

ज्ञानदा विद्यालयाला ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाचे तालुकास्तरीय प्रथम पारितोषिक वितरित

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील मोडाळे येथील ज्ञानदा माध्यमिक विद्यालयाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ ह्या अनोख्या अभियानात तालुक्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे. ३ लाख रुपये, सन्मानपत्र असे पारितोषिकाचे स्वरूप आहे. इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके, माजी जिल्हा परिषद सदस्य […]

देविदास नाठे यांची गटसचिव संघटनेच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड

प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज – नाशिक जिल्हा गटसचिव व कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा इगतपुरी तालुक्याचे भूमिपुत्र देवीदास नाठे यांची बिनविरोध निवड झाली आहेत. नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या सभेत ही निवड घोषित करण्यात आली.देविदास नाठे यांचे जिल्ह्यातील सर्व सचिवांकडुन अभिनंदन करण्यात आले. निवड झाल्यानंतर सचिव संघटनेचे राज्याध्यक्ष विश्वनाथ निकम, मालेगावचे भिला निकम, सिन्नरचे किरण गोसावी, […]

नाशिकचे सुप्रसिद्ध सुलेखनकार सचिन गडाख यांना राज्यस्तरीय अक्षर गौरव पुरस्कार प्रदान

इगतपुरीनामा न्यूज – नाशिक येथील सुप्रसिद्ध सुलेखनकार सचिन गडाख यांना तिसऱ्या राज्यस्तरीय अक्षर संमेलनात ‘अक्षर गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.रविवारी (दि. २६) कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्य विभागात आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनात संमेलनाध्यक्ष तथा राज्याच्या गृहविभागाचे सहसचिव व्यंकटेश भट यांच्या हस्ते गडाख यांना सन्मानित […]

संजीवनी माध्यमिक आश्रमशाळेचा दहावीचा निकाल १०० टक्के

इगतपुरीनामा न्यूज – महाराष्ट्र भटक्या विमुक्त जाती संघ संचलित संजीवनी माध्यमिक आश्रमशाळेचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. शिवम सुरेश माळी याने ७७ टक्के मिळवून आश्रम शाळेत प्रथम, सोहम रोहिदास भिडे याने ७४ टक्के मिळवून आश्रमशाळेत द्वितीय तर यश रामजी मोरे याने ७० टक्के मिळवून आश्रमशाळेत तृतीय क्रमांक पटकावला आहे. २६ पैकी एक विद्यार्थी विशेष […]

इगतपुरी तालुक्याचा १२ वी परीक्षेत ९४.२२ टक्के निकाल ; सर्व केंद्रांच्या गुणवत्तेत प्रगती : प्रथम श्रेणीत ६१० तर द्वितीय श्रेणीत १ हजार २४९ विद्यार्थी उत्तीर्ण ; ५४ विद्यार्थ्यांना विशेष प्राविण्य

इगतपुरीनामा न्यूज – बारावीचा ऑनलाइन निकाल जाहीर होऊन इगतपुरी तालुक्याचा निकाल ९४.२२ टक्के लागला आहे. यावर्षी उच्च श्रेणीत उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या, प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ झाल्याने विद्यार्थी व पालक वर्गात समाधानाचे चित्र आहे. तालुक्यात उच्च माध्यमिक व कौशल्य विकास अभ्यासक्रमाचे २ हजार २८१ विद्यार्थी परीक्षेला होते. त्यात २ हजार १३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. […]

error: Content is protected !!