
इगतपुरीनामा न्यूज – आश्रमशाळेत शिकलेला आदिवासी विद्यार्थी जिद्दीच्या जोरावर डॉक्टर होऊ शकतो हे खूपच प्रेरणादायी आहे. सामान्य कुटुंबातील माजी जिल्हा परिषद सदस्य केरु दादा खतेले यांनी त्यांचे सुपुत्र डॉ. संपत खतेले यांना शिक्षण देऊन डॉक्टर बनवले ही अभिमानाची गोष्ट आहे. इगतपुरी सारख्या आदिवासी भागात गोरगरिबांच्या सेवेसाठी सिद्धिविनायक हॉस्पिटल उपयुक्त ठरेल असे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. नरहरी झिरवाळ यांनी केले. घोटी येथील सिद्धीविनायक हॉस्पिटलच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत अध्यक्षस्थानी इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर होते. सिद्धीविनायक हॉस्पिटलचे संचालक डॉ. संपत खतेले, डॉ. सुप्रिया सुपे खतेले यांनी मान्यवरांचे स्वागत केले. माजी आमदार शिवराम झोले, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके, माजी जिल्हा परिषद सदस्य उदय जाधव, सीमंतिनी कोकाटे, जनार्दन मामा माळी, बाळासाहेब गाढवे, केरु दादा खतेले, सुनील वाजे, माजी सभापती रघुनाथ तोकडे, युवानेते बाळासाहेब झोले, भरत घाणे, विठ्ठल लंगडे, पोलीस निरीक्षक विजय शिंदे, संपत काळे, तुकाराम वारघडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पांडुरंग वारुंगसे, काशिनाथ कोरडे, दिलीप चौधरी, वसंत भोसले, अण्णा पवार, अनिल चौधरी, मदन कडू, नामदेव शिंदे, जनार्दन शेणे, अनिल वाजे, डॉ. श्रीराम लहामटे, हनुमंत बांगर, नामदेव भोसले, गौतम भोसले, विनायक काळे, रामदास गव्हाणे, निलेश काळे, अमोल जागळे, उत्तमराव शिंदे, स्वाती कडू, वैशाली गोसावी, सचिन तारगे, इगतपुरी तालुका मेडिकल असोसिएशन, मेडिकल असोसिएशन आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन विजय कर्डक यांनी केले. सिद्धीविनायक हॉस्पिटलच्या संचालिका सुप्रिया सुपे खतेले यांनी आभार मानले.