घोटीच्या समर्थ सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा उद्यापासून रुग्णसेवेचा नवा अध्याय : उपमुख्यमंत्री ना. अजित पवार, आरोग्यमंत्री ना. नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते होणार नव्या इमारतीचे उदघाटन

 

इगतपुरीनामा न्यूज – घोटी येथील समर्थ सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या स्थलांतरित नव्या इमारतीचे उद्या रविवारी सकाळी ९ वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते उदघाट्न होणार आहे. यावेळी नाशिक जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे सहसचिव रामदास गव्हाणे, उत्तम गव्हाणे, निलेश काळे यांच्या श्री मेडिकलचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. समर्थ सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलने इगतपुरी तालुक्यातील आरोग्यसेवेत एक नवा अध्याय सुरू केला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान, अनुभवी डॉक्टर्स, आणि समर्पित स्टाफच्या माध्यमातून हे हॉस्पिटल नागरिकांसाठी वरदान ठरत आहे. याठिकाणी सामान्य ताप, सर्दीपासून ते हृदयविकार, मेंदूच्या शस्त्रक्रिया आणि गंभीर आजारांपर्यंत सर्व प्रकारच्या आजारांवरचे उपचार सोयीस्करपणे उपलब्ध होणार आहेत. याशिवाय महामार्गावरील अपघातग्रस्त रुग्णांना तातडीने मदत करण्यासाठी अत्याधुनिक सुविधा आणि जलद प्रतिसाद देणारी वैद्यकीय टीम सज्ज करण्यात आली आहे. 

नागरिकांना उच्च दर्जाची आरोग्यसेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देणारे हे हॉस्पिटल आरोग्यसेवेत एक महत्त्वाचा टप्पा ठरेल. उपचारांसाठी मुंबई, नाशिक सारख्या मोठ्या शहरांमध्ये जाण्याची गरज कमी होऊन वेळेचा आणि पैशाचा मोठा बचाव होईल. यामुळे नागरिकांना विश्वासार्ह, दर्जेदार, आणि जलद आरोग्यसेवेचा अनुभव घेता येईल. उदघाटन कार्यक्रमाला आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री ना. प्रकाशराव आबिटकर, कृषिमंत्री ना. माणिकराव कोकाटे, आरोग्य राज्यमंत्री ना. मेघना बोर्डीकर, माजी मंत्री आ. छगन भुजबळ, आमदार हिरामण खोसकर, खासदार राजाभाऊ वाजे, माजी खासदार हेमंत गोडसे, आमदार सत्यजीत तांबे, राहुल ढिकले आणि इगतपुरीसह जिल्ह्यातील पदाधिकारी हजर राहणार आहेत. ह्या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन निमंत्रक डॉ. अमन नायकवडी, डॉ. अंजुम नायकवडी, डॉ. महेंद्र  शिरसाठ पाटील), डॉ. दत्ता सदगीर, डॉ. घनश्याम बऱ्हे, डॉ. सुनिल बुळे, डॉ. सविता  बुळे, डॉ. शैलेश देशपांडे, डॉ. योगेश्वर  भागडे, डॉ. सत्यवान रोकडे, डॉ. प्रियंका वाडेकर-चौधरी, नाशिक जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे सहसचिव रामदास गव्हाणे, उत्तम गव्हाणे, निलेश काळे यांनी केले आहे.

error: Content is protected !!