ब्रेकिंग न्यूज : एक तारखेपासून राज्यातल्या सर्व शाळा सुरू होणार!

इगतपुरीनामा न्यूज दि. २५ : कोविड महामारीमुळे बंद असलेल्या राज्यातील प्राथमिक शाळांची घंटा तब्बल दीड वर्षानंतर वाजणार आहे. एक डिसेंबर पासून राज्यातील सर्व शाळा पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या निर्णयाचे पालक, विद्यार्थी शिक्षक या सर्वांकडून स्वागत केले जात आहे. दिवाळीपूर्वी राज्यातील ग्रामीण भागातील शाळांमध्ये पाचवीपासून तर शहरी भागातील शाळांमध्ये आठवी पासून […]

ब्रेकिंग न्यूज : पहिलीपासून शाळा सुरू होणार!

इगतपुरीनामा न्यूज दि. १७ : कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा आता काही अंशी उघडल्या असल्या तरी अजूनही शाळा पूर्णपणे अनलॉक झालेल्या नाहीत. सद्यस्थितीमध्ये राज्याच्या ग्रामीण भागात पाचवीपासून चे वर्ग आणि शहरी भागात आठवी पासून चे वर्ग सुरू आहेत. मात्र आता लवकरच पहिलीपासून वर्ग सुरू होण्याचे संकेत मिळत असून मुख्यमंत्री महोदय यांनी मान्यता दिली तर लवकरच राज्यातील […]

इगतपुरी तालुका झाला कोरोनामुक्त ; तालुक्यात २ लाख लसीकरण पूर्ण : मिळालेले यश सर्व वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना समर्पित

इगतपुरीनामा न्यूज, दि. ९ इगतपुरी तालुक्यासाठी आनंदाच्या २ महत्वाच्या बातम्या आहेत. इगतपुरी तालुका संपूर्ण कोरोनामुक्त झाला असून आज अखेर कोरोना बाधितांची संख्या शून्यावर आली आहे. यासह दुसरी आनंदाची बातमी म्हणजे संपूर्ण तालुक्यात आजच २ लाख कोरोना लसीकरणाचे डोस पूर्ण झाले आहेत. यामध्ये ७५ टक्के लोकांनी लसीचा पहिला डोस घेतलेला आहे. उर्वरित लोकांचे लसीकरण लवकरच पूर्ण […]

पाचवीपासून शाळा सुरू, मात्र ग्रामीण भागातील चौथीपर्यंत शाळा अजूनही बंदच! सरसकट शाळा सुरू करण्याची मागणी

इगतपुरीनामा न्यूज दि. ५ : कोविडमुळे बंद असलेल्या शाळांमध्ये काल तब्बल दीड वर्षानंतर शाळेची घंटा वाजली आणि विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने शाळा गजबजून गेल्याचे चित्र काल पाहायला मिळाले. राज्य शासनाच्या आदेशाने काल राज्यभरात शाळा सुरू झाल्या. ग्रामीण भागातील शाळांमध्ये पाचवी पासून पुढचे वर्ग तर शहरी भागातील शाळांमध्ये आठवी पासून पुढचे वर्ग सुरू झाले आहेत. शाळा सुरू झाल्या […]

प्रमोद परदेशी यांच्यासारख्या कर्तृत्ववान शिक्षकांमुळे शिक्षणाचा प्रसार सुलभ : ना. बाळासाहेब क्षीरसागर

प्रमोद परदेशी यांना राज्यस्तरीय कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार वितरित इगतपुरीनामा न्यूज, दि. २० नाशिक जिल्ह्यातील कर्तृत्ववान शिक्षकांमुळे ग्रामीण भागातील शिक्षणाचा प्रसार परिणामकारक झाला. नवनवीन उपक्रमांमुळे शिक्षकांची भूमिका विद्यार्थ्यांना सक्षम बनवण्यासाठी फायदेशीर ठरली. यामुळेच “टीव्हीवरच्या शाळेचा धामडकीवाडी पॅटर्न” अनेकांसाठी दिशादर्शक ठरला. प्रमोद परदेशी यांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे त्यांच्या कार्याचे कौतुक करतो असे गौरवोद्गार नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ना. […]

इगतपुरी तालुक्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा १ लाखांचा टप्पा पूर्ण : गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडून आरोग्य यंत्रणेचे कौतुक

इगतपुरीनामा न्यूज, दि. ६ इगतपुरी तालुक्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा आज १ लाखाचा महत्त्वपूर्ण टप्पा पार केला. तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, रेल्वे रुग्णालय आणि दोन ग्रामीण रुग्णालयामधील आरोग्य यंत्रणेने लसीकरणाचा हा महत्त्वपूर्ण टप्पा पार पाडला. कोरोना रुग्ण संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी हे अतिशय महत्त्वपूर्ण पाऊल आहे. इगतपुरी, घोटी ग्रामीण रुग्णालय, रेल्वे रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र वाडीवऱ्हे, काननवाडी, […]

वाडीवऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदांमुळे सगळी आरोग्य यंत्रणा सलाईनवर

संतापलेल्या नागरिकांची रिक्त पदे भरण्याची मागणी इगतपुरीनामा न्यूज, दि. ३० इगतपुरी तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या आणि आरोग्यावर ताण असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणून  वाडीवऱ्हे ओळखले जाते. कोरोना काळापासून तर ह्या आरोग्य केंद्राला अतिरिक्त कामे करावी लागत आहे. अशा परिस्थितीत दुष्काळात तेरावा महिना काय असतो ह्याचे मोठे उदाहरण म्हणजे वाडीवऱ्हे आरोग्य केंद्र आहे. आरोग्य केंद्रासह अनेक उपकेंद्रांत […]

नाभिक समाज विकासासाठी केश शिल्पी बोर्डाचे तातडीने पुनर्गठन करावे : विविध मागण्यांसाठी सलून असोसिएशनकडून मुख्यमंत्र्यांना निवेदन

इगतपुरीनामा न्यूज, दि. १६ कोरोनाच्या संसर्गामुळे महाराष्ट्र राज्यभरातील नाभिक बांधव आणि व्यावसायिकांचे प्रचंड हाल झाले आहेत. भाड्याने घेतलेली दुकाने आणि घरे यामुळे उत्पन्नहीन झालेल्या नाभिक बांधवांना शासनाकडून कोणतीही मदत आणि दिलासा दिला गेलेला नाही. यामुळे नाभिकांमध्ये शासनाबाबत तीव्र स्वरूपाचा असंतोष उग्र स्वरूप धारण करीत आहे. इतर प्रवर्गासाठी शासनाने पुढे येऊन दिलेली मदत नाभिक बांधवांना लागू […]

रेल्वे प्रवासी संघाच्या वतीने कोरोना योध्दा के. डी. दोडामनी यांचा सन्मान

संदीप कोतकर, इगतपुरीनामा न्यूज दि. ११ कोरोना महामारीत इगतपुरी रेल्वे स्थानकावरील आर. आर. कंत्राटदारचे संचालक के. डी. दोडामनी यांनी प्रवाशांसह रेल्वे कर्मचाऱ्यांची चांगली सेवा केली. याबद्दल त्यांना रेल्वे प्रवासी संघाने कोरोना योद्धा म्हणून सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. इगतपुरी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष संजय इंदुलकर, प्रवासी संघाचे संस्थापक अय्याज खान, माजी नगरसेवक बाळासाहेब गांगुर्डे यांच्या हस्ते रेल्वे स्थानकात […]

हरिदास लोहकरे यांच्या संकल्पनेनुसार जागतिक आदिवासी दिनानिमित्त कोरोना प्रतिबंधक लसीकरण : आदिवासी बांधवांचा लसीकरणाला उदंड प्रतिसाद

इगतपुरीनामा न्यूज, दि. ९ जागतिक आदिवासी दिनानिमित्त इगतपुरी तालुक्यातील बारशिंगवे येथे दिव्यांग उद्योग केंद्रात कोरोना प्रतिबंधक लसीकरण व जनजागृती शिबीर संपन्न झाले. जिल्हा परिषद आरोग्य विभाग अंतर्गत प्राथमिक आरोग्य खेड व अधरवड उपकेंद्र, ग्रामपंचायत बारशिंगवे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे यांच्या सूचनेनुसार ह्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार आज जागतिक आदिवासी […]

error: Content is protected !!