“डेल्टा” विषाणू इगतपुरीच्या उंबरठ्यावर!

इगतपुरीनामा न्यूज दि. ७ : कोरोना विषाणूच्या विळख्यातून इगतपुरी तालुक्याची सुटका होते आहे असे चित्र निर्माण होवू लागले असतांनाच काल अनाहूतपणे डेल्टा विषाणूने तालुक्यात शिरकाव केला आहे. काल आलेल्या अहवालानुसार डेल्टा विषाणूचे नाशिक जिल्ह्यात तीस रुग्ण आढळून आले आहेत, त्यापैकी एक रुग्ण घोटी शहरातील असल्याची चर्चा काल दिवसभर सुरू होती. आरोग्य यंत्रणेच्या अहवालाने सुध्दा या […]

“माझ्या शेजाऱ्याला सांगतो मी बया…” : “जीवासाठी लय बेस आहे बया…”

ग्रामीण शहरी भागात बहुढंगी गीताची धमाल : गाणे ऐकल्यावर नाचण्याची होईल कमाल इगतपुरीनामा न्यूज, दि. ३१ आदिवासी भागामध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरणाबाबत अफवा पसरल्या आहेत. शहरी भागात सुद्धा हे लोन पसरले आहे. गैरसमज आणि भीती दूर व्हावी म्हणून ग्रामीण शैलीत भारुड आणि रॅप याचे मिश्रण अर्थात रिमिक्स करीत जनजागृती सुरू आहे. पेठ तालुक्यातील बोरवठ शाळेतील शिक्षक […]

कोरोनाचे उच्चाटन करण्यासाठी सर्वांनी लसीकरण करणे आवश्यक : डॉ. विजय माळी

इगतपुरीनामा न्यूज, दि. ३० कोरोनाचे संक्रमण थंडावले असले तरी अजून धोका मात्र टळलेला नाही. भविष्यात कोरोनाचे निर्दाळन करण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण केल्याशिवाय पर्याय नाही. लोकांमध्ये आता मोठ्या प्रमाणावर लसीकरण करण्याबाबत जागरूकता निर्माण झाली आहे. आमची आरोग्य यंत्रणा यासाठी सज्ज असून नागरिकांनी आपले लसीकरण प्राधान्याने करून घ्यावे असे आवाहन वाडीवऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. […]

कवितांचा मळा : लॉकडाऊन – एक आजार

कवी – शशिकांत भगवान तोकडे, घोटीसंवाद : 7083020259 म्हणती माझी माय, बाळा नको जाऊ तु बाहेरकाळजी वाटते रे मला तुझी, कारणं बाहेर आहे तो आजार, कोण्या दुष्मनानं केला घात, आणून टाकीला वेशीवरराहू आपण घरात, खाऊ मिरची भाकरं, आसवं येती डोळ्यांच्या बाहेर, त्यांना नाही आधारसांभाळून आसवांचा भार करू त्या आजारावर वार, सुखात होतो आपण, पण घातलंय […]

ह्या आठवड्यात इगतपुरी तालुका कोरोनामुक्त होणार ?

इगतपुरीनामा न्यूज, दि. २५ गेल्या काही दिवसांपासून ५ वर स्थिर असलेली कोरोना रुग्णांची संख्या आज १ वर आली आहे. आधीपासून उपचार सुरू असलेल्या पाचही रुग्णांनी आज कोरोनामुक्तीचा अनुभव घेत घरचा रस्ता धरला. आज १ नवीन रुग्ण आढळून आला आहे. आज आढळून आलेला हा रुग्ण सध्या तालुक्यातील एकमेव कोरोना रुग्ण आहे. त्याचीही लवकरात लवकर कोरोनापासून सुटका […]

अंबोलीत कोरोना योध्यांचा आमदारांच्या हस्ते सन्मान :
कोरोना काळात केलेल्या कामांचे आमदारांकडून कौतुक

इगतपुरीनामा न्यूज, दि. १९ त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंबोली येथे कोरोना महामारीत गावातील कोरोनाग्रस्त रुग्णांची योग्य प्रकारे काळजी घेण्यासाठी प्रशासन आणि ग्रामपंचायतने योग्य नियोजन केले.  सर्वानुमते १० दिवस गाव बंदचा निर्णय घेऊन येथील वाढणाऱ्या रुग्णांची संख्या कमी करण्याचे काम झाले. गावातील कायदा व सुव्यवस्था राखून याकाळात वेळोवेळी पोलिसांच्या मदतीसाठी येथील पोलीस पाटील यांचे देखील मोलाचे सहकार्य लाभले. […]

कल्याण, कसारा, इगतपुरी दरम्यान रेल्वे गाड्यांतील निकृष्ट खाद्यपदार्थ विकणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करा :  जागरूक प्रवाशांची मागणी

किशोर देहाडे, इगतपुरीनामा न्यूज, दि. १८ कोरोनामुळे रेल्वे गाड्यांतून गेल्या दीड वर्षांपासून सर्वसामान्य जनतेला प्रवास करण्यासाठी बंदी घालण्यात आलेली आहे. सध्या फक्त अत्यावश्यक सेवेतील अधिकारी कर्मचारी वर्गांकरीता परवानगी देण्यात आली आहे. अधिकृत ओळख पत्र असल्या शिवाय प्रवाशांना तिकीट देण्यात येत नाहीत. असे असताना इगतपुरी व कसारा रेल्वे स्थानकांतुन अनाधिकृत बाहेरील फेरीवाले चालत्या मेल – एक्सप्रेस […]

रविवार विशेष : कोरोनानंतरची शाळा आणि मुलांची मानसिकता

लेखक : श्री. काकासाहेब वाळुंजकर निवृत्त प्राचार्य तथा विभागीय अधिकारी, रयत शिक्षण संस्था मुक्त जीवन शैली आणि वेगवेगळ्या प्रकारचे होणारे रोगांचे आक्रमण यामुळे मानसिक विकार व शारीरिक आजारात भर पडत चाललेली आहे. विशेषतः कोरोनात किशोरवयीन मुले या आजारांना विशेष बळी पडताना दिसत आहेत. मानसिक विकार ,व्यसनाधीनता ,लैंगिक समस्या हिंसा द्वेष यांचाही समावेश होताना दिसतो आहे. […]

आज एकही बाधित रुग्ण, एकही कोरोनामुक्त रुग्ण नाही : रुग्णसंख्या ५ वर जैसे थे

इगतपुरीनामा न्यूज, दि. १५ सायंकाळी ५ वाजता हाती आलेल्या आकडेवारीनुसार इगतपुरी तालुक्यात आज एकही नवीन कोरोना रुग्ण आढळून आला नाही. उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांपैकी एकही रुग्ण कोरोनामुक्त झालेला नाही. त्यामुळे रुग्ण संख्या ५ वरच स्थिर आहे. दरम्यान बऱ्याच दिवसांनी आज नवीन रुग्ण संख्या शून्यावर आल्याने दिलासा मिळालेला असला तरी पाचवर स्थिर असलेली रुग्णसंख्या कोरोनामुक्तीच्या मार्गातला […]

कोरोनामुक्तीला पाच रुग्णसंख्येचे लागले ग्रहण

इगतपुरीनामा न्यूज, दि. १४ इगतपुरी तालुक्यात उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णसंख्या ५ वरचा भक्कमपणे स्थिर झाली आहे. आज २ रुग्णांनी कोरोनावर मात केली. आज सायंकाळी ५ वाजेपर्यंतच्या अहवालानुसार नव्या २ व्यक्तींचा चाचणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे अशी माहिती इगतपुरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी दिली. कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमाला इगतपुरी तालुक्यात भरघोस […]

error: Content is protected !!