गोरख बोडके यांना राज्यस्तरीय आदिवासी समाजसेवक पुरस्कार प्रदान : अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद आयोजित आदिवासी दिन कार्यक्रमात झाला सन्मान

इगतपुरीनामा न्यूज, दि. ९ जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गोरख बोडके यांच्या कोरोनाकाळातील कामगिरीबाबत सातत्याने अनेकांकडून माहिती दिली जात होती. याबाबत त्यांची भेट झाल्यावर त्यांचे विशेष कौतुक केले होते. अशा सुप्रसिद्ध व्यक्तिमत्वाला पुरस्काराने सन्मानित करतांना अत्यानंद होत आहे. आदिवासी समाज बांधव आणि समाजाच्या सर्व घटकांसाठी कोविड काळात 24 उपलब्ध असणारे गोरख बोडके सन्मानाला पात्र आहेत असे […]

एक हात मदतीचा : सलून असोसिएशनच्या वतीने नाभिक समाजातील गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

इगतपुरीनामा न्यूज, दि. २० इगतपुरी तालुक्यातील एक हात मदतीचा या सामाजिक उपक्रमांतर्गत नाभिक समाजातील गरीब विद्यार्थ्यांना सलून असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. घोटी येथील श्री संत सेना महाराज मंदिरात ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता १ ते १० वी मधील शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा ३ वर्षाचा शालेय शिक्षणाचा […]

शाळा सुरू झाली.. पण मध्यान्ह भोजन योजना मात्र अजूनही बंदच!

इगतपुरीनामा न्यूज दि. १६ : कोविडमुळे जवळपास पावणेदोन वर्षे बंद असलेल्या शाळा आता नियमितपणे भरू लागल्या आहेत. मध्यंतरी शाळा उघडल्या असल्या तरी कोरोना प्रादुर्भाव पुन्हा बळावल्याने शाळा बंद करण्याची वेळ आली होती, मात्र त्यानंतर आता फेब्रुवारीच्या सुरुवातीला शाळा नियमितपणे सुरू झाल्या आहेत. ग्रामीण भागातील बहुतांश शाळा पूर्ण विद्यार्थी क्षमतेने सुरू झाल्या आहेत, काही ठिकाणी अगदी […]

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाला ग्रामपंचायतींकडून केराची टोपली : ग्रामपंचायत स्तरावरील कर्मचारी प्रोत्साहनपर भत्त्यापासून अद्यापही वंचित

इगतपुरीनामा न्यूज, दि. २४ कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावरील कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर १ हजार रुपये भत्ता अदा करणेबाबत नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी जून २०२१ मध्ये निर्णय घेतलेला आहे. याबाबतचा पत्रव्यवहार सर्व पंचायत समित्या आणि तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना करण्यात आलेला आहे. संबंधितांकडून ग्रामपंचायतींना सूचना नसल्याने प्रोत्साहनपर भत्त्याच्या आदेशाला केराची टोपली मिळाली […]

ब्रेकिंग न्यूज : सोमवारपासून शाळा सुरू करण्यास राज्य सरकारची सशर्त परवानगी

इगतपुरीनामा न्यूज दि. २० : जेमतेम काही दिवस सुरू असलेल्या राज्यातील शाळा कोरोना रुग्ण संख्या पुन्हा वाढू लागल्याने राज्य शासनाने काही दिवसांपूर्वी पुन्हा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र आज झालेल्या राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत येत्या सोमवार पासून राज्यातील पहिली ते बारावीच्या सर्व शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी सरकारने परवानगी दिली असून स्थानिक परिस्थितीचा आढावा घेवून […]

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर इगतपुरी, वाडीवऱ्हे, घोटी पोलीस ठाणे ॲक्शन मोडवर : कोरोना नियमावलीचे पालन करण्याचे नागरिकांना आवाहन

इगतपुरीनामा न्यूज, दि. ९ राज्यभरात कोरोना संसर्ग पुन्हा जोर धरू लागला आहे. नागरिकही बेभानपणे नियमांची पायमल्ली करीत असल्याने संसर्गाचा धोका वाढत आहे. नाशिकचे पालकमंत्री ना. छगन भुजबळ यांनी कठोर निर्बंधांबाबत जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना सूचना केल्या आहेत. यासह मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांनीही नुकतेच नव्याने निर्बंध लागू केले आहेत. ह्या पार्श्वभूमीवर इगतपुरी, वाडीवऱ्हे, घोटी हे […]

“ओमीक्रॉन”च्या पार्श्वभूमीवर पुन्हा “शाळा बंद”च्या भीतीने धास्तावले विद्यार्थी आणि पालक!

इगतपुरीनामा न्यूज दि. ०४ : दोन वर्षे सुरू असलेला कोरोना संसर्ग अजून तरी काही कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. उलट त्यानंतर कोरोनाचे नवनवीन प्रकार समोर येत असल्याने अजूनही परिस्थिती म्हणावी तितकी स्थिर झालेली नाही. तब्बल दीड वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीच्या खंडानंतर नुकत्याच शाळा नियमित सुरू झालेल्या असतांनाच आता पुन्हा नव्याने आलेल्या ओमिक्रॉन या कोरोना च्या नव्या […]

इगतपुरी तालुक्यात कोरोनामुळे १६५ जणांचा आतापर्यंत मृत्यू : मयताच्या वारसाला ५० हजारांच्या सहाय्यासाठी करावा लागणार अर्ज : “अशी” आहे अर्ज करण्याची कार्यपद्धती

इगतपुरीनामा न्यूज, दि. १५ कोरोनाचा भयानक काळ मार्च २०१९ ला सुरू झाला. तेव्हापासून १६ नोव्हेंबर २०२१ पर्यंतच्या काळात इगतपुरी तालुक्यात कोरोनामुळे १६५ व्यक्तींचे मृत्यू झाले आहेत. कोरोनाने मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या आधार कार्डवरील पत्ता गृहीत धरून त्या त्या तालुक्यात याद्या बनवण्यात आल्या असल्याचे समजते. ‘कोविड-१९’ आजाराने मृत पावलेल्या ह्या व्यक्तींच्या निकटतम नातेवाईकास 50 हजार रुपयांच्या सानुग्रह […]

मुंढेगाव आश्रमशाळेतील १५ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण : वाडीवऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सतर्कतेने ३४० व्यक्तींची झाली चाचणी ; प्रतिबंधात्मक उपाययोजना युद्धपातळीवर सुरू

इगतपुरीनामा न्यूज, दि. ९ इगतपुरी तालुका कोरोनामुक्त झाला असतानाच मुंढेगाव येथील आदिवासी विकास विभागाचा इंग्रजी माध्यम निवासी आश्रमशाळेतील १५ विद्यार्थ्यांना कोरोना झाल्याचे निदान झाले आहे. ह्या शालेय विद्यार्थ्यांना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कळवण तालुक्यातील एका विद्यार्थ्याला किरकोळ लक्षणे जाणवत असल्याने त्याची चाचणी घेण्यात आली. यामध्ये त्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. ह्या […]

कोविड-19 या आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकटतम नातेवाईकास सानुग्रह सहाय्याला अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ विकसित

इगतपुरीनामा न्यूज, दि. 1 कोविड-19 या आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास रु. 50,000/- इतके सानुग्रह सहाय्य देण्याबाबत मा. सर्वोच्च न्यायालयाने दि. 4 ऑक्टो 2021 रोजी दिलेल्या निर्देशानुसार, महसूल व वन (आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन ) विभागाने शासन निर्णय 26 नोव्हेंबर रोजी प्रसारित केला आहे. या शासन निर्णयाच्या अनुषंगाने शासनाने Online web portal विकसित […]

error: Content is protected !!