ब्रेकिंग न्यूज : पहिलीपासून शाळा सुरू होणार!

इगतपुरीनामा न्यूज दि. १७ : कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा आता काही अंशी उघडल्या असल्या तरी अजूनही शाळा पूर्णपणे अनलॉक झालेल्या नाहीत. सद्यस्थितीमध्ये राज्याच्या ग्रामीण भागात पाचवीपासून चे वर्ग आणि शहरी भागात आठवी पासून चे वर्ग सुरू आहेत. मात्र आता लवकरच पहिलीपासून वर्ग सुरू होण्याचे संकेत मिळत असून मुख्यमंत्री महोदय यांनी मान्यता दिली तर लवकरच राज्यातील शाळा पूर्ण क्षमतेने म्हणजेच पहिलीपासून भरणार आहेत. शिक्षण विभागाच्या बैठकीत यासंबंधी निर्णय झाला असून आता मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

कोरोना रुग्णांची संख्या आता लक्षणीयरित्या कमी होऊ लागली आहे. बऱ्याच ठिकाणी ती शून्यावर आहे. असे असले तरी राज्यातील शहरी भागात सध्या आठवी पासून चे वर्ग सुरू आहेत आणि ग्रामीण भागात पाचवीपासून चे वर्ग सुरू आहेत. पूर्ण क्षमतेने म्हणजेच इयत्ता पहिली पासून वर्ग सुरू होण्याची पालक-शिक्षक, शाळा, विद्यार्थी असे सर्वच घटक वाट पाहत असून यासंबंधी लवकरात लवकर निर्णय घेतला जावा अशी अपेक्षा सर्व जण बाळगून आहेत. दरम्यान काल झालेल्या बैठकीत पहिलीपासून वर्ग सुरू करण्याला शिक्षण विभाग अनुकूल असल्याचे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले असून लवकरच पहिलीपासूनचे वर्ग सुरू होतील आणि राज्यातील शाळा पूर्ण क्षमतेने सुरू होतील अशी आशा आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!