रेल्वे प्रवासी संघाच्या वतीने कोरोना योध्दा के. डी. दोडामनी यांचा सन्मान

संदीप कोतकर, इगतपुरीनामा न्यूज दि. ११

कोरोना महामारीत इगतपुरी रेल्वे स्थानकावरील आर. आर. कंत्राटदारचे संचालक के. डी. दोडामनी यांनी प्रवाशांसह रेल्वे कर्मचाऱ्यांची चांगली सेवा केली. याबद्दल त्यांना रेल्वे प्रवासी संघाने कोरोना योद्धा म्हणून सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. इगतपुरी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष संजय इंदुलकर, प्रवासी संघाचे संस्थापक अय्याज खान, माजी नगरसेवक बाळासाहेब गांगुर्डे यांच्या हस्ते रेल्वे स्थानकात त्यांचा सत्कार करण्यात आला.

इगतपुरी रेल्वे स्थानकात ४० वर्षांपासून स्वादिष्ट जेवण देण्यासाठी दोडामनी खानावळचे सर्व कर्मचारी परिश्रम घेत आहेत. विशेषकरून रेल्वेची एखादी दुर्घटना घडल्यास या खानावळीतून रेल्वे प्रवाश्यांना मोफत जेवण दिले जाते. कोविड काळात त्यांनी अनेक प्रवाशांना मदत करत त्यांच्या कडे काम करणाऱ्या जवळपास ४० कर्मचाऱ्यांना किराणा भरून दिला आहे. काम करणारा कर्मचारी व त्याचे कुटुंबीय उपाशी राहणार नाही याची पूर्ण काळजी त्यांनी घेतली. यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला असल्याचे रेल्वे संघटनेचे संस्थापक अय्याज खान यांनी सांगितले. यावेळी सौरव दोडामनी, सोमनाथ सद्गुरु यांच्यासह दोडामनी केटरींगचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.