विकासाभिमुख, सर्वगुणसंपन्न आणि विकासाचे मॉडेल उभे करणारे इगतपुरीचे माजी आमदार शिवराम झोले

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – एकाच माणसात सुसंस्कार, सुसंस्कृत आणि सुस्वभाव याचा त्रिवेणीसंगम असणे अत्यंत दुर्मिळ आहे. याचसोबत वक्तृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व या तीनही गुणांचा संगम तर अगदीच अशक्य आहे. आध्यात्मिकता, लोकप्रियता आणि विद्वत्ता हे गुण तर लाखात एखाद्याच माणसात सापडतात. मात्र याला अपवाद ठरतात इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे माजी आमदार शिवराम शंकर झोले…! नमुद केलेले […]

इंदिरा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रमेश सदाशिव जाधव : विविधांगी विकासाचा आलेख असणारे व्यक्तिमत्व 

इगतपुरीनामा न्यूज – इंदिरा काँग्रेसचे इगतपुरी तालुकाध्यक्ष रमेश सदाशिव जाधव हे लोकनेते स्व. गोपाळराव ( दादासाहेब ) गुळवे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. स्व. दादांच्या समृद्ध विचारांची प्रेरणा आणि विकासाचे धोरण रमेश जाधव यांनी अंगीकारलेले आहे. त्यानुसार राजकीय, सामाजिक जीवनात त्यांनी सातत्याने शेतकरी, बेरोजगार व सामान्य माणसांच्या समस्या सोडवण्याचे काम केले आहे. संपूर्ण तालुका […]

नाशिकचे सुप्रसिद्ध सुलेखनकार सचिन गडाख यांना राज्यस्तरीय अक्षर गौरव पुरस्कार प्रदान

इगतपुरीनामा न्यूज – नाशिक येथील सुप्रसिद्ध सुलेखनकार सचिन गडाख यांना तिसऱ्या राज्यस्तरीय अक्षर संमेलनात ‘अक्षर गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.रविवारी (दि. २६) कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्य विभागात आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनात संमेलनाध्यक्ष तथा राज्याच्या गृहविभागाचे सहसचिव व्यंकटेश भट यांच्या हस्ते गडाख यांना सन्मानित […]

‘प्रत्येकाला मदत करणे’ हा लोकनेते स्व. गोपाळराव गुळवे यांचा धर्म होता – ‘मविप्र’ सरचिटणीस अ‍ॅड. नितीन ठाकरे

इगतपुरीनामा न्यूज – लोकनेते स्व. गोपाळराव गुळवे यांच्याकडे माणसे ओळखण्याची ताकद व समाजाला हवे ते देण्याचे सामर्थ्य होते. ‘मविप्र’ संचालक म्हणून त्यांनी केलेल्या कामाचा ठसा जिल्हाभर उमटला. माझ्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीतही त्यांचे मोलाचे योगदान होते असे प्रतिपादन ‘मविप्र’ सरचिटणीस अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी केले. इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने महाविद्यालयात लोकनेते स्व. गोपाळराव गुळवे […]

अनेकांना “जनसेवक” बनवणारे किमयागार आणि कृतिशील व्यक्तिमत्व निवृत्ती पाटील जाधव : सामान्य शिवसैनिक ते उपजिल्हाप्रमुख पदाद्वारे लोकप्रियता लाभलेला नेता

इगतपुरी तालुक्यातील तमाम नागरिकांसाठी ३६५ दिवस २४ तास ऊन, वादळ, पाऊस यांचा विचार न करता कटीबद्ध असणारे निवृत्ती पाटील जाधव अवघ्या नाशिक जिल्ह्याला सुपरिचित आहेत. राजकारणाच्या पलीकडे जाऊन सर्व पक्षीय नेते, कार्यकर्ते आणि उद्धवसाहेबांच्या शिवसैनिकांशी ऋणानुबंध निर्माण करणारे निवृत्ती पाटील जाधव शिवसेना ( उबाठा ) उपजिल्हाप्रमुख आहेत. सामान्य जनतेच्या प्रश्नांना वाहून घेत संवेदना ठेवून प्रश्नाचे […]

सामान्य इगतपुरीकरांचे “सिंघम” पोलीस अधिकारी राजू सुर्वे :  कर्तव्य दक्षतेमुळे गुन्हेगारी रोखण्यात यश ; अनेक गुन्हे आणले उघडकीस

इगतपुरीनामा न्यूज – मुंबई क्राईम ब्रॅंचमध्ये उल्लेखनीय काम करून इगतपुरीत पोलीस निरीक्षक म्हणून राजू सुर्वे १० मार्चपासून रुजू झाले. तेंव्हापासून त्यांची स्थानिक गुन्हे शाखेत बदली होईपर्यंत त्यांनी इगतपुरी पोलीस ठाणे हद्धीत आपल्या कामगिरीने पोलीस खात्याची शान वाढवली. जनमाणसात वेगळी प्रतिमा निर्माण करून गुन्हेगारांवर वचक निर्माण केला. त्यांच्या बदलीमुळे सर्वसामान्य इगतपुरीकर नागरिकांच्या डोळ्यांत अश्रू आले आहेत. […]

इगतपुरीचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे भक्तीधारा परिवाराच्या समाजरत्न पुरस्काराने सन्मानित

इगतपुरीनामा न्यूज – मुंबई क्राईम ब्रॅंचमध्ये उल्लेखनीय काम करून इगतपुरी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून राजू सुर्वे १० मार्चपासून रुजू झाले. तेव्हापासून त्यांनी इगतपुरी शहर आणि तालुक्यात आपल्या कामगिरीने पोलीस खात्याची शान वाढवली आहे. त्यांनी जनमानसात वेगळी प्रतिमा निर्माण करून गुन्हेगारांवर वचक निर्माण केला आहे. राजू सुर्वे यांनी अल्पावधीतच आपल्या कार्यकुशललेने इगतपुरी शहर परिसरातील गुन्हेगारीचा […]

लोकनेते स्व. गोपाळराव गुळवे यांच्या जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द : मराठा आरक्षण आंदोलनासाठी ॲड. संदीप गुळवे यांचा समाजभिमुख निर्णय

इगतपुरीनामा न्यूज – मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रभर अवघा समाज उभा ठाकला असून ह्या आंदोलनाला वेगवेगळ्या समाजाने पाठिंबा दिलेला आहे. समाजाचा लढा निर्णायक टप्प्यावर आला असल्याने ह्या परिस्थितीत ह्या आंदोलनाला बळ देण्यासाठी स्व. गोपाळराव गुळवे यांच्या जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. समाजासाठी दादांनी दिलेले योगदान आणि तोच वारसा पुढे चालवण्यासाठी जिल्ह्याचे नेते मविप्रचे संचालक ॲड. […]

श्री स्वामी समर्थ सूतगिरणीचे एप्रिल २०२४ पासून उत्पादन सुरु होणार – दलितमित्र डॉ. अशोकराव माने : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि वस्त्रोद्योग मंत्री करणार विशेष मदत

इगतपुरीनामा न्यूज : श्री स्वामी समर्थ अनुसूचित जाती महिला सहकारी सूतगिरणी इगतपुरीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. सामाजिक न्याय विभागाकडून कर्ज उपलब्ध झाल्यामुळे यंत्रसामग्री १ ऑक्टोंबरपासून येण्यास सुरवात होणार आहे. उर्वरित लागणाऱ्या लिंक कोनर मशीन वस्त्रोद्योग विभागाच्या उर्वरित भागभांडवलामधून व सामाजिक न्याय विभागाच्या उर्वरित कर्जामधून यंत्रसामुग्री खरेदी केली जाईल. पुढील वार्षिक सर्वसाधारण सभेपुर्वी ही सूतगिरणी उत्पादनाखाली […]

संजीवनी आश्रमशाळेत डॉ. काजल परदेशी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

इगतपुरीनामा न्यूज : इगतपुरी शहरातील प्रथीतयश वैद्यकीय व्यावसायिक आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉ. काजल परदेशी यांचा वाढदिवस संजीवनी आश्रम शाळेत उत्साहात साजरा करण्यात आला. आश्रमशाळा प्रशासनाकडून यावेळी त्यांचे हृद्य सत्कार करण्यात आला, त्याचबरोबर आश्रमशाळेतील विद्यार्थिनींनी डॉ. परदेशी यांचे औक्षण करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण आश्रमशाळेमध्ये मिळत आहे, त्याचबरोबर उत्तम दर्जाच्या भौतिक सुविधाही […]

error: Content is protected !!