राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मोडाळे ग्रामपंचायतीला मिळणार राष्ट्रीय पंचायत पुरस्कार : ११ डिसेंबरला नवी दिल्ली येथे राष्ट्रीय पंचायत पुरस्कार समारंभ

इगतपुरीनामा न्यूज – सर्वसमावेशक विकास करणाऱ्या राज्यातील ग्रामपंचायतींपैकी इगतपुरी तालुक्यातील मोडाळे ग्रामपंचायतीला राष्ट्रीय पंचायत पुरस्काराने देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. बुधवारी ११ डिसेंबरला राजधानी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय पंचायत पुरस्कार समारंभ होणार आहे. केंद्रीय मंत्री आणि मान्यवरांच्या उपस्थितीत मोडाळे ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गौरविण्यात […]

पक्ष संघटना वाढीसाठी काम करणाऱ्या युवकांना आगामी निवडणुकांत संधी देणार – ना. छगन भुजबळ : राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे ना. छगन भुजबळ यांचा सत्कार

इगतपुरीनामा न्यूज –  विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी  युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रचाराची धुरा हाती घेत जनतेमध्ये महायुतीने केलेल्या कार्याचा प्रचार प्रसार करण्याचे काम केले. त्याचा फायदा होऊन पक्षाला घवघवीत यश मिळाले. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीत युवकांना संधी देणार असल्याचे प्रतिपादन ना. छगन भुजबळ यांनी केले. जिल्हाध्यक्ष योगेश निसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या […]

जिल्हा परिषदेच्या विनोबा स्टार टिचर जिल्हास्तरीय पुरस्काराने वंदना सोनार सन्मानित

इगतपुरीनामा न्यूज – दरेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत उपक्रमशील शिक्षिका वंदना सोनार यांना महाराष्ट्र शासनाच्या आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रमांतर्गत उल्लेखनीय शैक्षणिक योगदानासाठी विनोबा स्टार टिचर जिल्हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल  यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. नुकताच अतिदुर्गम आदिवासीबहुल भागातील दरेवाडी शाळेच्या विद्यार्थ्यांनी वंदना […]

सोमवारी नाशिकमध्ये होणार नाभिक समाजरत्न पुरस्कार सोहळा : विधानसभा उपाध्यक्ष ना. नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते होणार मान्यवरांचा सन्मान

इगतपुरीनामा न्यूज – नाशिक जिल्ह्यातील नाभिक समाजात असणाऱ्या प्रतिभावान नागरिकांचा समाजरत्न पुरस्कार देऊन सोमवारी सन्मान करण्यात येणार आहे. नाभिक समाजाच्या न्याय आणि हक्कासाठी अहोरात्र कष्ट घेऊन समाजातील जडणघडणीत ज्यांचा मोलाचा वाटा आहे अशा नाशिक जिल्ह्यातील सुमारे ४२ नाभिक बंधू भगिनींचा सन्मान महाराष्ट्र राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष ना. नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते सोमवारी २१ ऑक्टोबरला दुपारी ३ […]

इंदिरा काँग्रेसच्या अल्पसंख्यांक इगतपुरी तालुकाध्यक्षपदी बिलाल सय्यद यांची निवड

इगतपुरीनामा न्यूज – नाशिक जिल्हा इंदिरा काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग अध्यक्ष हाजी तनवीर खान तंबोळी यांनी इगतपुरी तालुकाध्यक्षपदी पिंप्री सदो येथील सामाजिक कार्यकर्ते बिलाल अजीज सैय्यद यांची नियुक्ती केली आहे. यावेळी प्रदेश सचिव जावेद इब्राहिम, प्रदेश काँग्रेस सचिव भास्कर गुंजाळ, शहर काँग्रेस खजिनदार फारूक मन्सूरी, आदिवासी सेलचे प्रदेश अध्यक्ष बलवंत गावीत, दिंडोरी लोकसभेचे रमेश कहांडोळे, माजी […]

बाळासाहेब उर्फ जयप्रकाश झोले यांना आदिवासी समाजरत्न पुरस्कार घोषित : शुक्रवारी ११ ऑक्टोबरला नागपूरला वितरण

इगतपुरीनामा न्यूज – आदिवासी युवा नेते बाळासाहेब उर्फ जयप्रकाश शिवराम झोले यांना आदिवासी समाजरत्न राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. शुक्रवारी ११ ऑक्टोबरला नागपूर येथे होणाऱ्या धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या पूर्वसंध्येला मतदार परिवर्तन मेळाव्यात श्री. झोले यांना सन्मानपूर्वक पुरस्काराचे वितरण करण्यात आहे. त्यांचे वडील इगतपुरीचे माजी आमदार शिवराम झोले यांच्या संस्कारातुन सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्राचे बाळकडू घेऊन […]

रोटरी क्लब ऑफ नाशिक ग्रेप सिटीकडून ११ शिक्षकांना नेशन बिल्डर पुरस्काराचे वितरण

इगतपुरीनामा न्यूज – राष्ट्र उभारणीत शिक्षकांचे मोलाचे योगदान असल्याने रोटरी क्लब ऑफ नाशिक ग्रेप सिटीकडून गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षकांना नेशन बिल्डर पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षी हा कार्यक्रम नाशिक येथे मोठ्या दिमाखात पार पडला. नेशन बिल्डर पुरस्कार वितरण रोटरी क्लब ऑफ नाशिक ग्रेप सिटीच्या अध्यक्ष रेणू पनीकर यांच्या हस्ते आणि माजी अध्यक्ष जयंत खैरनार, डॉ. […]

आदिवासी म. ठाकूर – ठाकर समाजाच्या इगतपुरी तालुकाध्यक्षपदी ॲड. मारुती आघाण : बैठकीत नवीन पदाधिकाऱ्यांच्या झाल्या नियुक्त्या

इगतपुरीनामा न्यूज – सह्याद्री आदिवासी म. ठाकूर ठाकर समाज उन्नती मंडळ नाशिक जिल्हा अंतर्गत आदिवासी म. ठाकूर – ठाकर समाजाच्या इगतपुरी तालुकाध्यक्षपदी ॲड. मारुती रामभाऊ आघाण यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे. खैरगांवचे लोकनियुक्त सरपंच आणि घोटी बाजार समितीचे संचालक म्हणून ॲड. आघाण यांनी चांगली कामगिरी केलेली आहे. समाजाची इगतपुरी तालुकास्तरीय बैठक बोर्ली येथे संपन्न […]

शिरसाठे ग्रामपंचायतीला संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता पुरस्काराचे वितरण : विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम आदींच्या हस्ते मिळाला पुरस्कार

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील शिरसाठे ग्रामपंचायतीला संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात जिल्हास्तरीय तिसरा क्रमांक मिळाला आहे. नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, मुख्य कार्यकारी अधिकारी असीमा मित्तल, खासदार भास्कर भगरे यांच्या हस्ते लोकनियुक्त सरपंच सुनिता दत्ता सदगीर, उपसरपंच साहेबू वामन गांगुर्डे, ग्रामसेवक हनुमान दराडे, ग्रामपंचायत सदस्य वर्षा केशव बोडके, अनिता सुरेश चंदगिर, मंजुळा पप्पू शिद, […]

मदन कडू यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या नांदगाव सदो गटप्रमुखपदी सार्थ निवड : इगतपुरी तालुक्यातून होतोय अभिनंदनाचा वर्षाव

इगतपुरीनामा न्यूज – तळोघ, ता. इगतपुरी येथील मदन किसन कडू यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाच्या नांदगाव सदो जिल्हा परिषद गटप्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके, नाशिक जिल्हाध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, माजी आमदार शिवराम झोले, इगतपुरी तालुकाध्यक्ष पांडुरंग वारुंगसे आदींच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने […]

error: Content is protected !!