
इगतपुरीनामा न्यूज – नाशिक जिल्हा इंदिरा काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग अध्यक्ष हाजी तनवीर खान तंबोळी यांनी इगतपुरी तालुकाध्यक्षपदी पिंप्री सदो येथील सामाजिक कार्यकर्ते बिलाल अजीज सैय्यद यांची नियुक्ती केली आहे. यावेळी प्रदेश सचिव जावेद इब्राहिम, प्रदेश काँग्रेस सचिव भास्कर गुंजाळ, शहर काँग्रेस खजिनदार फारूक मन्सूरी, आदिवासी सेलचे प्रदेश अध्यक्ष बलवंत गावीत, दिंडोरी लोकसभेचे रमेश कहांडोळे, माजी नगरसेविका उषा बेंडकूळे, हिरामण बेंडकूळे, मुन्ना ठाकुर, मुन्ना तड़वी, राजकुमार जेफ, इगतपुरी तालुकाध्यक्ष रामदास धांडे, बाळासाहेब वालझाडे, माजी सरपंच ताहिर पटेल, साजिद इनामदार, सलीम तंबोळी, ताहेर शेख, इमरान मिर्झा, नसीम खान, अकील सय्यद, सोमनाथ साळुंके, आसिफ शेख, अमीर सैय्यद, तनवीर पटेल, अमन पटेल, कैफ पटेल, हमजा पटेल, अबरार पटेल, सलमान पटेल, विकार शेख उपस्थित होते. बिलाल सय्यद यांनी पक्ष मजबुतीसाठी एकनिष्ठेने व जोमाने काम करू अशी ग्वाही दिली.