इगतपुरीनामा न्यूज – विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रचाराची धुरा हाती घेत जनतेमध्ये महायुतीने केलेल्या कार्याचा प्रचार प्रसार करण्याचे काम केले. त्याचा फायदा होऊन पक्षाला घवघवीत यश मिळाले. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीत युवकांना संधी देणार असल्याचे प्रतिपादन ना. छगन भुजबळ यांनी केले. जिल्हाध्यक्ष योगेश निसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित सत्कार सोहळ्या निमित्त ना. भुजबळ बोलत होते. जिल्हाध्यक्ष योगेश निसाळ यांनी प्रास्ताविकात रोजगार, उद्योगाच्या माध्यमातून युवकांचे सक्षमीकरण करणार असल्याचे सांगितले. यावेळी नामदार भुजबळ यांचा भव्य फुलांचा हार देऊन सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन सरचिटणीस प्रफुल्ल पाटील यांनी, आभार त्र्यंबकेश्वर तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाले यांनी मानले. यावेळी वजाहत शेख, नाशिक कार्याध्यक्ष कपिल भावले, संजय पगारे, प्रज्योत सुरवाडकर, संदीप दिघोळे, संघटक अमर जगताप, मयूर पाटील, दिपक बर्गे, आशुतोष चव्हाण, सिद्धांत भवर, सचिन बिडकर, सिद्धार्थ गायकवाड, अमोल खांडबहाले, संकेत उगले, सचिन ढगे, अमोल भावले, निखिल चौधरी, भूषण बागुल, रोहित जाधव, आदित्य पगारे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group