
इगतपुरीनामा न्यूज – नाशिक जिल्ह्यातील नाभिक समाजात असणाऱ्या प्रतिभावान नागरिकांचा समाजरत्न पुरस्कार देऊन सोमवारी सन्मान करण्यात येणार आहे. नाभिक समाजाच्या न्याय आणि हक्कासाठी अहोरात्र कष्ट घेऊन समाजातील जडणघडणीत ज्यांचा मोलाचा वाटा आहे अशा नाशिक जिल्ह्यातील सुमारे ४२ नाभिक बंधू भगिनींचा सन्मान महाराष्ट्र राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष ना. नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते सोमवारी २१ ऑक्टोबरला दुपारी ३ वाजता खांदवे सभागृह, पंचवटी नाशिक येथे होणार आहे. ह्याप्रसंगी माजी सभापती, सभागृह नेते तथा माजी नगरसेवक गणेश गिते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाप्रसंगी जिल्ह्यातील नाभिक समाज बांधवानी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सलून असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष तथा कार्यक्रमाचे आयोजक विजय आप्पा पंडित, ॲड. सुनिल कोरडे, निवृत्ती आंबेकर, देविदास बिडवे, तुषार जगताप, श्रीकांत वाघ, जगदीश सोनवणे, गणेश जाधव, एकनाथ शिंदे, किरण शिंदे, किरण कडवे, किरण पंडित, राजेंद्र नगरकर व गोरख जगताप आदींनी केले आहे.