
इगतपुरीनामा न्यूज – आदिवासी युवा नेते बाळासाहेब उर्फ जयप्रकाश शिवराम झोले यांना आदिवासी समाजरत्न राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. शुक्रवारी ११ ऑक्टोबरला नागपूर येथे होणाऱ्या धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या पूर्वसंध्येला मतदार परिवर्तन मेळाव्यात श्री. झोले यांना सन्मानपूर्वक पुरस्काराचे वितरण करण्यात आहे. त्यांचे वडील इगतपुरीचे माजी आमदार शिवराम झोले यांच्या संस्कारातुन सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्राचे बाळकडू घेऊन शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी पोहचविण्यासाठी बाळासाहेब जीव ओतून काम करतात. कोणत्याही प्रसिद्धीचा मोह नसणाऱ्या बाळासाहेबांनी जनतेच्या मनामनात घर निर्माण केले आहे. आदिवासी विद्या प्रसारक समाज घोटी बुद्रुक संचलित कवडदरा आश्रमशाळा / राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा चिटणीस असलेले जयप्रकाश ( बाळासाहेब ) झोले यांना राजकीय क्षेत्राचा २५ वर्षांचा दीर्घ अनुभव आहे. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात अनेक वर्षांपासून काम करीत असून अनेक वंचितांना प्रखरतेने न्याय मिळवून देण्याचे त्यांनी काम केले आहे. त्याची दखल घेऊन त्यांना पुरस्कार घोषित झाल्याने आंबेडकरी महिला मोर्चाच्या नवनियुक्त महाराष्ट्र प्रदेश महासचिव रेखाताई रावणगावकर, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे घोटी शहराध्यक्ष इम्रान सय्यद, भाऊसाहेब गायकवाड, विजय पाटील, योगेश नाठे, संपत पोटकुले आदींनी अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या.