
इगतपुरीनामा न्यूज – सह्याद्री आदिवासी म. ठाकूर ठाकर समाज उन्नती मंडळ नाशिक जिल्हा अंतर्गत आदिवासी म. ठाकूर – ठाकर समाजाच्या इगतपुरी तालुकाध्यक्षपदी ॲड. मारुती रामभाऊ आघाण यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे. खैरगांवचे लोकनियुक्त सरपंच आणि घोटी बाजार समितीचे संचालक म्हणून ॲड. आघाण यांनी चांगली कामगिरी केलेली आहे. समाजाची इगतपुरी तालुकास्तरीय बैठक बोर्ली येथे संपन्न झाली. संघटनेचे राज्य सचिव माजी आमदार पांडुरंगबाबा गांगड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष मंगाजी खडके यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून शंकर सावंत, जिल्हा उप कार्याध्यक्ष पदी पांडुबाबा पारधी यांना बढती देण्यात आली. जिल्हा सचिवपदी ॲड. निवृत्ती हरी कातोरे, सहसचिवपदी जगन्नाथ रामदास ठोंबरे तालुका उपाध्यक्ष हरिश्चंद्र रघुनाथ भले, तालुका सचिव राजू काळू गांगड, तालुका खजिनदार चंद्रकांत भागुजी सराई, तालुका संघटक पंढरीनाथ तुळशीराम आगिवले यांची निवड करण्यात आली. माजी सभापती कावजी ठाकरे, देविदास हिंदोळे यांनी मार्गदर्शन केले. नवनियुक्त पदाधिकारी यांनी समाजाला उन्नतीकडे नेण्यासाठी भरीव कामगिरी करावी अशा शुभेच्छा समाजबांधवांनी दिल्या. यावेळी संतोष सखाराम आगिवले, सोमनाथ आगिवले, एकनाथ वाक, सखाराम शिद, दीपक तेलम, गोविंद सावंत, प्रकाश दरवडे, विठ्ठल दरवडे, वसंत भगत, मधुकर तेलम, योगेश आगीवले, दामू भला, एकनाथ तेलम, बुधा तेलम, कमलू दरवडे, पिंटू सावंत, तुकाराम खोडके, विष्णू कामडी, सोमनाथ वारघडे, कृष्णा तेलम, आकाश भले, गोविंद भले, ज्ञानेश्वर उघडे, जयराम खडके, एकनाथ ठाकरे, राघो सावंत आदींसह तालुक्यातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. मश्चिंद्र भले यांनी सर्वांचे आभार मानले.