
इगतपुरीनामा न्यूज – पिंप्री सदो येथील रोहित अशोक सोनवणे याची मुंबई शहर पोलीस दलात नव्याने नियुक्ती झाली असून तो गावाचा प्रथम पोलीस ठरला आहे. इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांनी ग्रामस्थांतर्फे त्याचा सन्मान केला. जिल्हा परिषद मराठी माध्यम शाळेत हा कार्यक्रम संपन्न झाला. त्याचे वडील अशोक किसन सोनवणे, आई अरुणा अशोक सोनवणे यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले. पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांचे सामाजिक कार्यकर्ते फिरोज शेख, अमजद पटेल, तंटामुक्ती अध्यक्ष बबलू उबाळे यांनी स्वागत करून सत्कार केला. प्राथमिक शिक्षक माणिक भालेराव यांचा निरोप समारंभ पार पडला. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामदास वाघचौरे व पोलीस पाटील रमेश पाटेकर यांनी त्यांचा सन्मान केला. कार्यक्रमावेळी ग्रामपंचायत सदस्य जयश्री उबाळे, माजी उपसरपंच प्रकाश उबाळे, जामा मस्जिद सदस्य आसिफ पटेल, सोमनाथ साळुंके, कुलदिप उबाळे, नवनाथ सोनवणे शफीक पठाण, बिलाल सय्यद, उद्योजक जगन कदम, मुख्याध्यापक सुखदेव ठाकरे, विलास उबाळे, विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक नेते निवृत्ती नाठे यांनी केले. अश्विनी वाघ हिने सोनवणे परिवारातर्फे सर्वांचे आभार मानले.