
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील नागोसली ग्रामपंचायतीला आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. ROHS Certification Pvt Ltd संस्थेने मानांकनापूर्वी ग्रामपंचायतीची सुसज्ज इमारत, ग्रामपंचायतीचे नियमित दप्तर व आर्थिक तपासणी (ऑडिट), ग्रामपंचायतीच्या प्रत्येक कक्षाची मांडणी, गावाची स्वच्छता, रस्ते, अंगणवाडी, शैक्षणिक सेवा सुविधा, पाणीपुरवठा, आरोग्य आदींची पाहणी करून गुणांकन ठरविले. ग्रामपंचायत स्तरावर विविध शासकीय योजना व उपक्रम राबवून गावाचा सर्वांगीणदृष्ट्या विकास झालेला आहे. गावाचा विकास साधत असताना ग्रामपंचायतीने लोकोपयोगी उपक्रम, शासकीय कामातील सहभाग वाखाणण्याजोगा राहिला आहे. नागरिकांना सेवासुविधा देण्याच्या दृष्टिकोनातून ग्रामपंचायतीने शासकीय योजनांची योग्यप्रकारे अंमलबजावणी केली. त्यामुळे मानांकनाचे प्रमाणपत्र संस्थेचे प्रतिनिधी योगेश शिंदे यांनी दिले. यावेळी सरपंच आशा गिऱ्हे, नितीन खातळे, शांताराम खोडके, दत्तू गिऱ्हे, हनुमंत शिद, मुन्ना लोभी, विष्णु शिंदे, सागर ताठे, ग्रामसेवक संभाजी मारकंडे हे उपस्थित होते.