
इगतपुरीनामा न्यूज – पिंप्री सदो गावाचे शेतकरी अशोक किसन सोनवणे, अरुणा अशोक सोनवणे यांचे चिरंजीव रोहित अशोक सोनवणे यांची मुंबई शहर पोलीस या ठिकाणी निवड झाली आहे. ही बातमी समजताच पिंप्री सदो गावातील त्यांचे नातेवाईक, मित्र मंडळ आणि ग्रामस्थांनी एकच जल्लोष केला. सर्वांनी रोहितला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. पिंप्री सदो गावाच्या इतिहासात रोहित हा पहिला पोलीस ठरला आहे. यावेळी रोहितला विविध माध्यमातून शुभेच्छा देण्यात आल्या. सरपंच मंजुळा कावजी ठाकरे, उपसरपंच शैनाज बद्रोद्दिन शेख, पीके ग्रुपचे अध्यक्ष प्रशांत कडू, उद्योजक जगन कदम, पोलीस पाटील रमेश पाटेकर, ग्रामपंचायत सदस्य जयश्री उबाळे, ज्ञानेश्वर कदम, भास्कर सोनवणे, गणेश वाजे, माजी उपसरपंच प्रकाश उबाळे, ग्रामसेवक गुलाब साळवे, सामजिक कार्यकर्ते अमजद पटेल, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष बबलू उबाळे, सामजिक कार्यकर्ते फिरोज शेख, जामा मस्जिद ट्रस्टी मतीन पठाण, आसिफ पटेल, दर्गा ट्रस्टी आरिफ जहागीरदार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामदास वाकचौरे, सोमनाथ साळुंके, संदीप उबाळे, शिक्षक वर्ग आणि सर्व ग्रामस्थांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.