राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश संघटक सचिवपदी उमेश खातळे यांची निवड

इगतपुरीनामा न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी इगतपुरी तालुकाध्यक्ष व राष्ट्रवादीचे विद्यार्थी काँग्रेसपासून ते युवक काँग्रेसमध्ये विविध पदांवर काम केलेले उमेश खातळे यांच्या कार्याची दखल घेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश सचिव संघटकपदी त्यांची निवड केली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र दिले आहे. यावेळी मेहबूब शेख उपस्थित होते. उमेश खातळे यांनी यापूर्वी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कामगार सेल अध्यक्ष व इगतपुरी तालुक्यातील नांदडगांव ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करत आहे. त्यांच्या मातोश्री सुद्धा नांदडगाव ग्रामपंचायत सदस्य आहेत. युवक प्रदेश कार्याध्यक्ष पुरूषोत्तम कडलग, जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, गजानन शेलार, गोकुळ पिंगळे, युवक जिल्हाध्यक्ष शाम हिरे, दिनेश धात्रक, केलास मोरे, किरण भुसारे, महिला अध्यक्ष संगीता पाटील यांनी त्यांच्या निवडीचे स्वागत केले. यावेळी नारायण वळकंदे, सुनील गाढवे, काशिनाथ कोरडे, संजय कोकणे, मनिष भागडे, योगेश धांडे, मधुकर खकाळे, अंबादास खातळे, जावेद शेख, दत्तू मते, सुनील शेलार, योगेश गायकर, विजय जाधव, अरुण गायकर, दामू शेलार, तालुका युवक अध्यक्ष किरण कातोरे, विद्यार्थी अध्यक्ष तेजस भोर ,युवक कार्यध्यक्ष सोमनाथ घारे, भिका पानसरे, अरुण वाजे, दिपक नागरे, राजु गतीर, नामदेव शिदे , दशरथ जमधडे, रामदास जमधडे, बस्तिराम खातळे, शंकर गोवर्धने आदींनी त्यांच्या निवडीचे स्वागत केले आहे.

Similar Posts

error: Content is protected !!