जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली शिरसाठे सोसायटीच्या १३ जागा बिनविरोध

इगतपुरीनामा न्यूज, दि. २०

शिरसाठे आदिवासी विकास सोसायटी ही इगतपुरी तालुक्यातील महत्वाची असणारी सहकारी सोसायटी आहे. ह्या सोसायटीच्या निवडणुकीत जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गोरख बोडके यांनी बाजी मारली आहे. संपूर्ण १३ पैकी १३ जागा बिनविरोध करण्यात गोरख बोडके यांना चांगले यश मिळाले आहे. आगामी कृषी उत्पन्न बाजार समिती आणि जिल्हा बँक निवडणूकीच्या अनुषंगाने ही बिनविरोध निवड महत्वाची मानली जात आहे.

इगतपुरी तालुक्यातील शिरसाठे आदिवासी विकास सोसायटी जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली काम करते. ह्या संस्थेच्या १३ संचालकांच्या निवडणुकीत बिनविरोध निवड करण्याची परंपरा सुरू झाली आहे. गोरख बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली १३ संचालक बिनविरोध निवडल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घोषित केले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!