सभापती विठ्ठल लंगडे यांच्या नेतृत्वाखाली कांचनगाव सोसायटीच्या चेअरमनपदी संतु भगत तर व्हॉइस चेअरमनपदी बाळा गव्हाणे बिनविरोध

इगतपुरीनामा न्यूज, दि. ९

कांचनगाव आदिवासी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची चेअरमन आणि व्हॉइस चेअरमन पदांची निवड शिवसेनेचे गटनेते तथा इगतपुरी पंचायत समितीचे सभापती विठ्ठल लंगडे यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध करण्यात आली. चेअरमनपदी संतु रामा भगत तर व्हॉइस चेअरमनपदी प्रकाश ( बाळा ) त्र्यंबक गव्हाणे यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी परदेशी यांनी घोषित केले. सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी चांगले काम करण्याचा संकल्प नूतन कार्यकारिणीने केला असल्याचे सभापती विठ्ठल लंगडे यावेळी म्हणाले. बिनविरोध निवडीप्रसंगी सर्व नवीन संचालक मंडळ उपस्थित होते.

निवडणुक निर्णय अधिकारी परदेशी यांच्याकडे चेअरमनपदासाठी संतु रामा भगत, व्हॉइस चेअरमनपदासाठी प्रकाश ( बाळा ) त्र्यंबक गव्हाणे यांचा प्रत्येकी एकमेव अर्ज प्राप्त दाखल झाल्याने बिनविरोध निवडीची घोषणा करण्यात आली. यावेळी संचालक देविदास विठ्ठल लंगडे, निवृत्ती भाऊ भगत, सखाराम काळु लाव्हरे, ज्ञानेश्वर दलु भगत, हरिश्चंद्र दलु भगत, कैलास दलु भगत, शैलेंद्र बाळासाहेब चंद्रमोरे, शितल शंकर भगत, ताईबाई सोनु भगत आदी उपस्थित होते. निवडीची घोषणा होताच कार्यकर्त्यांकडून घोषणा व आतिषबाजी करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे इगतपुरी तालुकाप्रमुख भगवान आडोळे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन ज्ञानेश्वर लहाने, पंचायत समितीचे सभापती विठ्ठल लंगडे, माजी पंचायत समिती सदस्य नंदलाल भागडे, पी. के. ग्रुपचे अध्यक्ष प्रशांत कडु, उपसरपंच भगीरथ कडु, माजी उपसरपंच रामदास गव्हाणे, सतिष गव्हाणे, माजी उपसरपंच नंदू यशवंत माळी, पोपट लंगडे, फुलचंद कडु, शिवसेना जेष्ठ नेते गोरख कडु, मच्छिंद्र कडु, लालु दुभाषे, अंकुश कडु, पिंटु गोईकणे, राजाराम गव्हाणे, एकनाथ गव्हाणे, मुरलीधर दुभाषे, जनार्दन लंगडे, दत्तू गव्हाणे, नामदेव पाटील गव्हाणे यांच्यासह बहुसंख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!