अडसरे बुद्रुक आदिवासी सोसायटी निवडणुकीत नवख्या परिवर्तन शेतकरी विकास पॅनलचा दणदणीत विजय : शेतकरी विकास पॅनलच्या पदरात फक्त भोपळाच

इगतपुरीनामा न्यूज, दि. १५

इगतपुरी तालुक्यातील अत्यंत महत्वाच्या अडसरे बुद्रुक आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या एकूण १३ पैकी ११ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत तरुणांनी उभ्या केलेल्या नवख्या उमेदवारांच्या परिवर्तन शेतकरी विकास पॅनलचे सर्वच्या सर्व उमेदवार मोठ्या फरकाने निवडून आले आहेत. २ जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या होत्या. त्यात भटक्या विमुक्त जातीमध्ये एकनाथ परदेशी तर इतर मागास प्रवर्गात किशोर परदेशी निवड झाल्याचे घोषित केले होते. उर्वरित ११ जागांसाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत परिवर्तन शेतकरी विकास पॅनलने शेतकरी विकास पॅनलचा  दारुण पराभव केला. विरोधकांच्या हाती भोपळा पडल्याने सत्तांतर झाले.

निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये कर्जदार आदिवासी खातेदार प्रतिनिधी मध्ये ज्ञानेश्वर निवृत्ती साबळे, रामा वाळू कातडे, दिलीप उत्तम साबळे, हिरामण शिवराम कातोरे , शिवाजी मुरलीधर साबळे, मंगल सावळीराम तातळे हे तर महिला राखीव गटात किसनाबाई सीताराम चौरे, मीराबाई मदन साबळे, बिगर आदिवासी कर्जदार गटात मधुकर चेंडू कुंदे, अनुसूचित जाती जमाती गटात जेंबू आबाजी साबळे हे निवडून आले आहेत. अडसरे बुद्रुक सोसायटीची निवडणूक विविध मुद्यांवर रंगली. त्यात प्रामुख्याने सोसायटीकडे असणाऱ्या रेशन दुकानाचा मनमानी कारभार हा प्रमुख मुद्दा मतदारांना चांगलाच भावला. त्यातून सत्ता परिवर्तन घडवून आणल्याचे बोलले जात आहे.मतदारांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवू असे नवनिर्वाचित संचालक मंडळाने यावेळी सांगितले. परिवर्तन पॅनलच्या विजयी उमेदवारांचे ग्रामस्थ अडसरे बुद्रुक व शेतकरी मतदारांनी अभिनंदन केले. परिवर्तन शेतकरी विकास पॅनलच्या विजयासाठी नवतरुणांनी जेष्ठांच्या साहाय्याने हा बदल घडवून आणला. त्यात सागर साबळे, शिवाजी तातळे, शशिकांत कुंदे, जालिंदर कातडे, संपत फोडसे यांसह मदन साबळे, किसन साबळे, सरपंच संतु साबळे, गुलचंद साबळे , आदींनी परिश्रम घेतले. परिवर्तन शेतकरी विकास पॅनलच्या विजयी उमेदवारांनी समर्थकांसह मुख्य चौकातील आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून विजयोत्सव साजरा केला.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!