गोंदे दुमाला सोसायटीच्या चेअरमनपदी विजय कचरू नाठे, व्हॉइस चेअरमनपदी संजय अमृता नाठे बिनविरोध : स्वीकृत संचालकपदी गौतम रुंजा नाठे यांची वर्णी

इगतपुरीनामा न्युज, दि. २३

मोठी औद्योगिक वसाहत आणि जिल्हाभराच्या राजकारणात अतिशय महत्वाच्या असणाऱ्या गोंदे दुमाला विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी विजय कचरू नाठे यांची बिनविरोध निवड झाली आहे. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आज पार पडलेल्या निवडणुकीत चेअरमन, व्हॉइस चेअरमन पदासाठी निवडणूक घेण्यात आली. व्हॉइस चेअरमनपदावर संजय अमृता नाठे यांचीही बिनविरोध वर्णी लागली आहे. यासह सोसायटीच्या स्वीकृत संचालकपदी गौतम रुंजा नाठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अनुभवसंपन्न आणि राजकारणाचा दीर्घ अनुभव असलेल्या सहकार विकास पॅनेलचे नेतृत्व माजी सरपंच गणपत जाधव, माजी चेअरमन विजय बळवंतराव नाठे, राजाराम बाबुराव धोंगडे, हरिश्चंद्र बाबुराव नाठे, इंदिरा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रमेश जाधव यांनी केले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण १२ जागांवर पॅनलच्या उमेदवारांनी विजय मिळवला होता.

चेअरमन विजय कचरू नाठे, व्हॉइस चेअरमन संजय अमृता नाठे, स्वीकृत संचालक गौतम रुंजा नाठे यांच्या बिनविरोध निवडीप्रसंगी विजय बळवंतराव नाठे, राजाराम बाबुराव धोंगडे, हरिश्चंद्र बाबुराव नाठे, इंदिरा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रमेश जाधव, शांताराम जाधव, भगवान नाठे, नामदेव नाठे, कृष्णा सोनवणे, गंगुबाई नाठे, चंद्रकला नाठे हे संचालक उपस्थित होते. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे इगतपुरी तालुक्यात अभिनंदन सुरू आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!