पाडळी देशमुख सोसायटीच्या चेअरमनपदी विष्णु पाटील धोंगडे तर व्हॉइस चेअरमनपदी विलास धांडे बिनविरोध : ॲड. संदीप गुळवे यांच्या नेतृत्वाखाली झाली निवड प्रक्रिया

प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज, दि. १५

इगतपुरी तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणाऱ्या पाडळी देशमुख सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी विष्णु पाटील धोंगडे तर व्हॉइस चेअरमनपदी विलास रामचंद्र धांडे यांची बिनविरोध निवड झाली. जिल्हा बँकेचे संचालक तथा काँग्रेस नेते ॲड. संदीप गुळवे यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध निवड करण्यात आली. इगतपुरी तालुक्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सध्या सुरू असुन पाडळी देशमुख येथील सहकारी संस्थेच्या संचालकांची निवड या आधीच बिनविरोध झालेली आहे. चेअरमन व व्हॉइस चेअरमनपदासाठी विशेष सभा आज घेण्यात आली. चेअरमनपदासाठी विष्णु पाटील धोंगडे व व्हॉइस चेअरमनपदासाठी विलास रामचंद्र धांडे यांचे प्रत्येकी एकच अर्ज विहित वेळेत दाखल करण्यात आले. त्यानुसार सर्व संचालक मंडळाच्या सहमतीने या दोनही पदांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी नितु शिंदे  व सचिव देवीदास नाठे यांनी घोषित केले.

निवडणूक प्रक्रियेप्रसंगी संचालक रामभाऊ धांडे, रामदास धांडे, मधुकर धांडे, दिलीप धोंगडे, जयराम धांडे, निवृत्ती धांडे, कचरू गवारी, हिराबाई चौधरी, शांताबाई धांडे आदी उपस्थित होते. निवडीची घोषणा होताच सर्व संचालक मंडळ व ग्रामस्थांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष केला. नवनिर्वाचित चेअरमन विष्णु धोंगडे, व्हॉइस चेअरमन विलास धांडे आदींचा काँग्रेस नेते ॲड. संदीप गुळवे यांनी सत्कार केला. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रमेश जाधव, माजी सभापती रामदास बाबा मालुंजकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, माजी आमदार शिवराम झोले, कारभारी नाठे, सरपंच खंडेराव धांडे, माजी सरपंच तानाजी धोंगडे, रामकृष्ण धोंगडे, त्र्यंबक धोंगडे, सुरेश धांडे, फकीरराव धांडे, उपसरपंच बाळू आमले, रामदास जाधव, रामभाऊ धोंगडे, दत्तु गायकर, भानुदास धांडे, उत्तम फोकणे, भाऊसाहेब धोंगडे, सुयश मालुंजकर आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!