इगतपुरीनामा न्यूज, दि. ५
अडसरे बुद्रुक आदिवासी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत नवतरुणांनी जेष्ठांच्या सहाय्याने निवडणुकीत उडी घेतली आहे. आदिवासी बांधवांच्या न्याय हक्कासाठी परिवर्तन शेतकरी विकास पॅनेलची निर्मिती केली असून कपबशी ही निवडणूक निशाणी पॅनलने घेतली आहे. रविवारी १५ मे ह्या दिवशी सकाळी ८ ते ४ या वेळेत मतदान घेतले जाणार आहे. सामान्य आदिवासी माणसाच्या प्रश्नांची सोडवणूक व विकासासाठी परिवर्तन शेतकरी विकास पॅनलची निर्मिती केली असून गोरगरिबांना मोफत मिळणारे रेशन नियमित मिळण्यासाठी व अडसरे बुद्रुक येथील शेतकरी बांधवांना शेती कर्ज व इतर योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी हा पॅनल तयार करण्यात आला आहे. कपबशी ही पॅनलच्या उमेदवारांची निशाणी असून सभासद मतदार बांधवांनी आम्हाला साथ द्यावी. आदिवासी शेतकरी गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी निवडून द्यावे असे आवाहन सभासद मतदार बांधवांनी आम्हाला साथ द्यावी व आदिवासी शेतकरी गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी निवडून द्यावे असे आवाहन पॅनलचे निर्मिती करणारे नवतरुण सागर साबळे, शिवा तातळे, शशिकांत कुंदे, जालिंदर कातडे, मदन साबळे, गुलचंद साबळे, किसन साबळे, सदाशिव साबळे, उमेदवार दिलीप साबळे, हिरामण कातोरे, मधुकर कुंदे, रामा कातडे, शिवाजी साबळे, किसनाबाई चौरे, जंबु साबळे, मीराबाई साबळे, मंगल तातळे, ज्ञानेश्वर साबळे यांनी केले आहे.
अडसरे बुद्रुक सोसायटीच्या नावाने रेशन दुकान असून सामान्य गोरगरीब आदिवासी बांधवांना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचे मोफत धान्य गेल्या काही महिन्यांपासून मिळत नाही. लोकांसाठी येणारे धान्य जाते कुठे ?? हा मोठा प्रश्न आहे. नियमित मिळणारे धान्य खूपच कमी प्रमाणात मिळते तर काही महिन्याचे मिळत नाही. गोरगरीब आदिवासी बांधवांची मोठी पिळवणूक व फसवणूक असून संस्थेने याकडे दुर्लक्ष केले आहे असा आरोप युवकांनी यावेळी केला आहे. युवक पुढे म्हणाले की, आदिवासी सामान्य शेतकरी बांधवांच्या विकासासाठी व कल्याणासाठी स्थापन करण्यात आलेल्या विविध कार्यकारी सहकारी संस्थेचा आदिवासी बांधवांना पाहिजे तसा फायदा होताना दिसत नाही. नेहमीच्याच सभासदांना कर्ज वाटप व कर्जमाफी होते. गरजू व गरीब आदिवासी शेतकरी मात्र कायम वंचित ठेवला जातो. संस्थेचे संचालक मंडळ हे कोणालाही विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेतात. सामान्य आदिवासी शेतकरी बांधवांपर्यंत कोणत्याही योजनांची माहिती देत नाहीत. अडसरे बुद्रुक येथे मोठ्या संख्येने शेतकरी असून संस्थेत असणाऱ्या नेहमीच्या कार्यकारी मंडळाने नवे सभासद का केले नाही हाही मोठा प्रश्न आहे. यामुळेच आदिवासी शेतकरी विकासापासून वंचित राहत आहे असेही त्यांनी सांगितले. ह्या पार्श्वभूमीवर परिवर्तन शेतकरी विकास पॅनल निवडणुकीत उतरला आहे.