इगतपुरीनामा न्यूज – मुंढेगांव येथील शासकीय इंग्रजी माध्यम निवासी आश्रमशाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ५५० विद्यार्थ्यांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या दोन दिवस आधी विद्यार्थ्यांचा योगासनांचा सराव घेण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी मान, हात आणि पायाचे अशा सर्व योगासनाचे प्रकार केले. हस्त संचालन, गुडघा संचालन, ताडासन, त्रिकोणासन, वृक्षासन, पादस्तासन, वज्रासन, हलासन भुजंगासन, […]
इगतपुरीनामा न्यूज : राष्ट्रीय स्कूल डेव्हलपमेंट अँड प्रमोशन फेडरेशन ऑफ इंडिया आणि डॉ. निलेश राणे युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने मातोश्री मीनाताई ठाकरे क्रीडा संकुल येथे सहाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. सात ते नऊ जून या कालावधीसाठी या स्पर्धा आयोजित करण्यात आले असून आयकर आयुक्त डॉ. रविराज खोगरे आणि नाशिक ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस […]
इगतपुरीनामा न्यूज : नाशिक शहरातील मातोश्री मीनाताई ठाकरे क्रीडा संकुल येथे सहाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. 7 ते 9 जून या तीन दिवसांची ही क्रीडा स्पर्धा असून यात पहिल्याच दिवशी झालेल्या कबड्डी लीग सामन्यात महाराष्ट्राने सुवर्ण पदक पटकावले आहे. ओडिशासोबत झालेल्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या संघातील नाशिकच्या तरुण गाढे आणि मंगेश लोखंडे यांनी […]
इगतपुरीनामा न्यूज : आयपीएल म्हणजे क्रिकेट विश्वातील मोठा महोत्सव असल्याची क्रिकेटप्रेमी रसिकांची भावना आहे. शालेय विद्यार्थ्यांना सुद्धा आयपीएलचे मोठे आकर्षण आहे. ऑनलाईन माध्यमातून क्रिकेट पाहून आपली हौस भागवणारे विद्यार्थी आहेत. स्टेडियममध्ये बसून मॅच बघण्याची मजा काही वेगळीच असते. म्हणूनचज आयपीएलचा थरार आपल्याला थेट स्टेडियमवर बसून पाहायला मिळावा असे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र आदिवासी अतिदुर्गम भागात […]
इगतपुरीनामा न्यूज – आयडियल तायक्वांदो अकॅडमी इगतपुरीचे काम अतिशय प्रेरणादायी असून यांच्यामार्फत उत्कृष्ठ खेळाडू उदयाला येत आहेत. ह्या सर्वांच्या सामूहिक शक्तीने इगतपुरी तालुक्यातील खेळाडू आपल्या कौशल्यातून भरीव यश मिळवतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके, घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा तायक्वांदो अँड फिटनेस असोसिएशन ऑफ इगतपुरी तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर दादा […]
इगतपुरीनामा न्यूज – वेदांत रोहिदास शिर्के ह्याने ३२ वी महाराष्ट्र राज्य सबज्युनिअर, ज्युनिअर क्योरूगी व ९ वी पुमसे तायक्वांडो स्पर्धा २०२३-२४, वजन गट ४५ ते ४८ किलो मध्ये कांस्य पदक पटकावले. नाशिक क्रीडा संकुलात २७ ते २९ जानेवारी ला या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विविध जिल्ह्यातील तायक्वांदो खेळाडू सहभागी होते. वेदांतने मिळवलेल्या […]
इगतपुरीनामा न्यूज – मानवेढे येथे झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष चषक तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत पेहरेवाडी शाळेने घवघवीत यश संपादन केले आहे. धावण्याच्या स्पर्धेत पेहेरेवाडीचा खेळाडू विशाल शिद याने ४०० मीटर धावणे स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवला. मुलांच्या कबड्डी संघाने प्रथम दोन सामने एकहाती जिंकत अंतिम सामन्यात धडक मारली. अटीतटीची लढत होऊन अंतिम सामना पेहेरेवाडीने तीन गुणांनी […]
इगतपुरीनामा न्यूज – लोकमत, लोकमत टाइम्स, लोकमत समाचार, लोकमत टाईम्स आणि कॅम्पस क्लबच्या संयुक्त विद्यमानाने नाशिकच्या विभागीय क्रीडा संकुलामध्ये महाराष्ट्रास् बिगेस्ट स्कूल ऑलम्पिक २०२३ लोकमत महा गेम्स-२०२३ चे आयोजन केले होते. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील विविध शाळांच्या अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यामध्ये इगतपुरी येथील आयडियल तायक्वांदो अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून घवघवीत यश मिळविले. यशस्वी खेळाडूंना घोटी […]
शरद मालुंजकर : इगतपुरीनामा न्यूज – महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय क्रिकेट पंच पॅनल परीक्षेत इगतपुरी वाडीवऱ्हे येथील वैभव दिलीप कातोरे यांनी उज्वल यश मिळवले आहे. सामान्य शेतकरी कुटुंबातून असणाऱ्या वैभवने शेतीसह शिक्षणाला महत्व देऊन परिश्रम घेतले. यामुळे देशांतर्गत क्रिकेट सामन्यात पंच म्हणून त्यांची निवड झाली आहे. महाराष्ट्रातील १९७ उमेदवारांमधून वैभव दिलीप कातोरे याने ९६ टक्के […]
इगतपुरीनामा न्यूज – धामणी येथे २७ एप्रिलपासून सरपंच चषक, राजे भोसले क्रिकेट क्लब धामणी, छत्रपती बॉईज ११ पिंपळगाव मोर आयोजित ओव्हरम क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. क्रिकेटप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन आयोजक गणेश भोसले, समाधान काळे, सौरभ बेंडकोळी, वैभव कुंदे, सामाजिक कार्यकर्ते ईश्वर भोसले, कल्पेश काळे, सोमनाथ येडे, दीपक भोसले, संदीप भोसले, […]