
इगतपुरीनामा न्यूज – नाशिक येथे २९ आणि ३० एप्रिलला आयोजित करण्यात आलेल्या इंडियन तायक्वांदो यांच्यातर्फे भारतातील दुसरी किड्स चॅम्पियन ऑफ चॅम्पियन स्पर्धा संपन्न झाली. यामध्ये इगतपुरीतील आयडियल तायक्वांदो अकॅडमीच्या खेळाडूंनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. या स्पर्धेत आयडियल तायक्वांदो अकॅडमीच्या खेळाडूंनी ११ सुवर्णपदक, ४ रौप्य पदक आणि ३ कांस्य पदक अशी १८ पदकांची कमाई करून घवघवीत यश मिळवले. या स्पर्धेमध्ये ८ वर्ष आतील २४ किलो गटात दक्षिता शर्मा, २२ किलो गटात गारवी पगारे, ३० किलो गटात तेजस्विनी आव्हाड, किस्तिजा जोगदंड, १० वर्ष आतील २८ किलो गटात गुंजन जगताप यांनी सुवर्णपदक पटकावले. १४ वर्ष आतील ३७ किलो गटात नंदिनी जगताप, १० वर्ष आतील २९ किलो गटात सिद्धी सपकाळे, २५ किलो गटात धनराज भगत, ९ वर्ष आतील ३५ किलो गटात सक्षम हांडोरे, ३७ किलो गटात शौर्य टेकुळे, १४ वर्ष आतील ४५ किलो गटात यश येले यांनीही सुवर्ण पदकांची कमाई केली. ८ वर्ष आतील २२ किलो गटात ईशानी गांजवे, ६ वर्ष आतील १८ किलो गटात जिज्ञासा हांडोरे, १२ वर्ष आतील ३८ किलो गटात ऋषिकेश गांजवे, १४ वर्ष आतील ६५ किलो गटात सोहम सरकाळे यांनी रौप्य पदक पटकावले. ६ वर्ष आतील १८ किलो गटात त्रिशना कांडेकर, ११ वर्ष आतील ३८ किलो गटात तृप्ती लहाने, ९ वर्ष आतील २७ किलो गटात रूद्र लहाने यांनी कांस्य पदक मिळवले. आयडियल तायक्वांदो अकॅडमीला एकूण १८ पदके मिळाल्याने खेळाडूंनी जल्लोष केला. यशस्वी विजेत्यांना मुख्य प्रशिक्षक विशाल जगताप, सह प्रशिक्षक खंडू लहाने, शिक्षक देवेंद्र भावसार, माधव तोकडे, कार्तिक जगताप, मीना जगताप, सुबोध जगताप यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. महाराष्ट्र तायक्वांदो असोसिएशनचे अध्यक्ष संदीप ओंबासे, महासचिव गफार पठाण, खजिनदार डॉ. प्रसाद कुलकर्णी यांनी पदक प्राप्त खेळाडू व मार्गदर्शक प्रशिक्षकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
