
इगतपुरीनामा न्यूज – नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या इगतपुरी येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात आंतर महाविद्यालयीन शरीर सौष्ठव स्पर्धा संपन्न झाल्या. सात गटात झालेल्या ह्या स्पर्धेवेळी विविध महाविद्यालयातील विद्यार्थी व त्यांचे प्रशिक्षक उपस्थित होते. महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष हेमंत सुराणा यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन झाले. नाशिक विभाग क्रीडा समितीचे सचिव डॉ. नरेंद्र निकम, सहसचिव मनिष देवरे, इंगळे, हौशी शरीर संस्था संघटनेचे सचिव गोपाळ गायकवाड व सहकारी, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य रमेश राठी हजर होते. स्पर्धेचे प्रास्ताविक महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रतिभा हिरे यांनी केले. कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमास राहुल पंडित यांचे सहकार्य लाभले. नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी अश्विनीकुमार येवला यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस व ट्रॉफी देण्यात आली. विद्यार्थ्यांनी अशा स्पर्धेत भाग घेऊन सशक्त भारत बनवण्यास मदत करावी. वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात सहभाग घेऊन आजचा तरुण खेळू लागला तर तो व्यसनाच्या आहारी जाणार नाही असे आपल्या मनोगतात त्यांनी म्हटले. कार्यक्रमाचे नियोजन क्रीडा संचालिका प्रतिभा सकट यांनी तर आभार प्रा. रवींद्र नाडेकर यांनी मानले. महाविद्यालयातील स्पर्धक त्यांचे प्रशिक्षक, प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने प्रेक्षक हजर होते.
