
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील कबड्डी प्रेमी व खेळाडूंसाठी सुवर्ण संधी असून कबड्डी प्रशिक्षण वर्गाचे प्रवेश सुरु होत आहे. ह्या प्रशिक्षण वर्गाचा उदघाटन समारंभ शनिवारी ११ ऑक्टोबरला सायंकाळी ४ वाजता नांदगाव सदो येथे होणार आहे. नावाजलेले प्रो कबड्डी व आंतरराष्ट्रीय खेळाडु श्रीकांत जाधव यांच्या हस्ते शुभारंभ होणार असल्याची माहिती जय हनुमान कबड्डी क्रीडा मंडळ नांदगाव सदो यांनी दिली. सर्वानी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला इगतपुरी तालुक्यातील राजकीय, सामाजिक, क्रीडा, शैक्षणिक आदी क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.