इगतपुरीनामा न्यूज – रेझिंग डे अर्थात पोलीस स्थापना दिवसानिमित्त इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपले रक्तदान केले. पोलीस स्थापना दिवस आणि या दिवशी पोलिसांना ध्वज प्रदान करण्यात आल्याच्या निमित्ताने दरवर्षी जानेवारीचा पहिला आठवडा रेझिंग डे सप्ताह म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त वाडीवऱ्हे […]
इगतपुरीनामा न्यूज – जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रेरणेतून इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सदो सेवा केंद्र येथील कै. दत्तात्रय सहदेव ठमके वय ८४ यांचे त्यांच्या इच्छेनुसार मरणोत्तर देहदान करण्यात आले. नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या पुढाकारातून झालेले हे ७५ वे मरणोत्तर देहदान आहे.धामणगाव येथील एसएमबीटी वैद्यकीय महाविद्यालयाला कुटुंबियांनी कै. दत्तात्रय सहदेव ठमके यांचा देह सुपूर्द केला. […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यात आपल्या आदर्श आणि सेवाभावी कार्याने सुपरिचित असणारे कुमारशेठ चोरडिया यांची इगतपुरी तालुका केमिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी सार्थ निवड करण्यात आली आहे. मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी ही निवडीची घोषणा करून नियुक्तीपत्र दिले. यावेळी नाशिक जिल्हा मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश आहेर, उपाध्यक्ष गणेश निकम, अतुल आहेर, गोरख चौधरी, सुरेश […]
किरण घायदार : इगतपुरीनामा न्यूज : धावत्या रेल्वेत वा बसमध्ये प्रसुती कळा सुरू होऊन महिला प्रसूत झाल्याच्या अनेक घटना आपण वाचतो, ऐकतो. तशाच प्रकारची एक घटना आज बुधवारी दुपारी नाशिक ते नंदुरबार या एसटी बसमध्ये घडली. नाशिक नंदुरबार बस क्रमांक एमएच 40 वाय 5668 ह्या बसमध्ये सटाणा दरम्यान प्रवास करणाऱ्या गरोदर महिलेची प्रसूती झाल्याची माहिती […]
भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील घोटी येथील मातोश्री हॉस्पिटल म्हणजे दुर्मिळ अतिदुर्मिळ शस्त्रक्रिया आणि गंभीर आजारावर उपचार करणारे सर्वोत्तम रुग्णालय म्हणून जिल्हाभर मान्यता पावले आहे. हॉस्पिटलच्या संचालक डॉ. हेमलता चोरडिया, डॉ. जितेंद्र चोरडिया यांच्यातील सेवाभाव आणि जोखीम घेऊन लोकांना वाचवण्याचे त्यांचे कौशल्य वाखाणण्याजोगे आहे. आपले तज्ज्ञ, कुशल डॉक्टर आणि सहकाऱ्यांसह रुग्णांवर उपचाराची […]
इगतपुरीनामा न्यूज – गोंदे दुमाला येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे. जागतिक सल्लागार संतोष सांगळे व सहकारी यावेळी मार्गदर्शन करणार आहे. यामध्ये वजन वाढवणे, कमी करणे, जास्त एनर्जी स्त्रियांचे आजार, लहान मुलांच्या आहार मार्गदर्शन, पाचक आरोग्य योगा प्राणायाम व बांबू वर्क यावर सखोल असा मार्गदर्शन मिळेल. […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम धामडकीवाडी येथे प्रल्हाद ओंकारवती फाऊंडेशनतर्फे विद्यार्थी शिक्षक आणि ग्रामस्थांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी विविध आजारावर नि:शुल्क चिकित्सा शिबीर आणि वैद्यकीय उपचार करण्यासाठी फाउंडेशनच्या आरोग्य पथकाने परिश्रम घेतले. फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. मनुश्री मुखर्जी, डॉ. प्रसाद देसाई, संस्थापक सदस्य शशिकांत मुखर्जी यांच्याकडून जिल्हा परिषद शाळेत स्वच्छता पंधरवडा कार्यक्रमांतर्गत स्वच्छतेचे […]
दीपाली जगदाळे : इगतपुरीनामा न्यूज – ‘परमेश्वरास संकटकाळी प्रत्येक वेळी उपस्थित राहणे शक्य नसल्याने त्याने डॉक्टरांची निर्मिती केली आहे’ या विचाराची प्रचिती पानेवाडी ( ता. नांदगाव ) येथील काकड कुटुंबियांना बुधवारी आली. त्यांच्या एक वर्षाच्या चिमुकल्याने खेळता खेळता बामची डबी गिळली असता त्यास मरणाच्या दारातून परत आणण्यास डॉक्टरांना यश आले. त्यामुळे डॉक्टरांच्या रूपात काकडे कुटुंबीयांनी […]
इगतपुरीनामा न्यूज – वैतरणा नगर प्राथमिक आरोग्य केंद्रातील बेजबाबदार कामकाजाबाबत इगतपुरीच्या तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडे वारंवार लेखी, तोंडी, फोन द्वारे तक्रारी केल्या. मात्र अद्याप पर्यंत ह्या आरोग्य केंद्रातील कामकाजात काहीही सुधारणा झालेली नाही. एकही वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी मुख्यालयात रहात नाही. रुग्णांवर सफाई कर्मचारी व नर्स उपचार करत असतात. दोन दिवसापूर्वी सातूर्ली फाट्यावरील अपघातात दहा प्रवासी […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तीन दिवसांपूर्वी मुंबईहून आल्यानंतर त्यांना ताप, सर्दी, अंगदुखी असा त्रास सुरु झाला. त्यांचे चिरंजीव वामन खोसकर ह्यांच्यावर सध्या डेंग्यूचे उपचार सुरु आहेत. म्हणून आपल्याला डेंग्यू असल्याचा संशय आल्याने आमदार खोसकर यांनी वैद्यकीय उपचार घेतले. यासाठी हॉस्पिटलने केलेल्या कोरोना तपासणीनुसार त्यांना […]