भावली धरणाजवळ मोठी दरड कोसळतेय ; पर्यटकांनो सावधान

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यात पावसाची संततधार सुरूच असून तालुक्याचे विशेष आकर्षण असणाऱ्या भावली धरण भागात मोठी दरड कोसळली आहे. धरणे ओसंडून वाहत असल्याने पाणीपातळीत वाढ झाली आहे. यातच दरड कोसळल्याने त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे. पावसामुळे ह्या घटना सतत घडत असल्याने प्रशासन सतर्क झाले असले तरी प्रशासनाचा वेळकाढूपणा चांगलाच नजरेस आला आहे. इगतपुरी तालुक्यात […]

माणिकखांब येथे अज्ञात समाजकंटकांनी जाळल्या ४ मोटारसायकली : ३ मोटारसायकली भस्मसात ; १ अंशत: जळाली

इगतपुरीनामा न्यूज – माणिकखांब, ता. इगतपुरी येथे रात्री २ ते ३ वाजेच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांकडून ४ मोटारसायकली जाळल्याची घटना आज पहाटे उघडकीस आली. दाट लोकवस्तीमधील घरांच्या समोर उभ्या असणाऱ्या ह्या मोटारसायकली जाळण्याची घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. सुरेश चव्हाण, हरिभाऊ चव्हाण, अनिल भटाटे, राजू भटाटे यांच्या मोटारसायकली जाळण्यात आल्या आहेत. या चार […]

३ युवती आणि २ युवक असे ५ जण भावली धरणात बुडून मृत्यूमुखी

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील भावली धरणात ५ जणांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मृतांमध्ये ३ युवती आणि २ युवकांचा समावेश आहे. हे सर्वजण आज दुपारी रिक्षा घेऊन धरणावर फिरण्यासाठी आले होते. सर्वजण नाशिकरोड येथील गोसावीवाडी परिसरातील राहणारे असून तिकडे शोककळा पसरली आहे. इगतपुरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन कार्यवाही सुरु केली आहे. […]

बिबट्याच्या हल्ल्यात वनरक्षक आणि ग्रामस्थ जखमी ; नाशिकची टीम घटनास्थळी दाखल

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील उंबरकोन परिसरात गुरुवारी एका मुलावर बिबट्याचा हल्ल्याची घटना घडली होती. आज सकाळी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पिंजरा लावण्यासाठी गेले असता ह्या बिबट्याने वनरक्षकांवर हल्ला केला आहे. यामध्ये ग्रामस्थांसह जवळपास दहा जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तात्काळ घोटी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार देऊन पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात […]

तीन वाहनांचा विचित्र अपघात ; ४ जण जखमी : नरेंद्राचार्य संस्थान रुग्णवाहिकेने केले मदतकार्य

इगतपुरीनामा न्यूज – मुंबई आग्रा महामार्गावर नाशिकहून मुंबईच्या दिशेने जात असताना आठवा मैल जवळ आज दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास तीन वाहनांचा विचित्र भिषण अपघात झाला. या अपघातात तीन जण गंभीर तर एक जण किरकोळ जखमी झाला. प्रविण भिका रोजेकर वय 52, हिरल प्रविण रोजेकर वय 46 या सिडको नाशिक, किसन अरूण धोंगडे वय 74, रुख्मिणी […]

कसारा घाटात ट्रकला लागली आग ; एक्सप्रेसवे अग्निशमन दलाने केले मदतकार्य 

इगतपुरीनामा न्यूज – नासिककडून मुंबईच्या दिशेने चाललेला ट्रक आज पहाटे अचानक पेटला. ट्रकचा क्रमांक MH 27 BX 7674  असून ह्या ट्रकला नव्या कसारा घाटात शॉर्ट सर्किटमुळे  अचानक आग लागली. मुंबई नासिक एक्सप्रेसवे अग्निशमन दलाच्या मदतीने ही आग विझवण्यात आली. ह्या घटनेत सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही. आगीच्या घटनेची माहिती समजताच मुंबई नासिक एक्सप्रेसवे गस्त […]

खळबळजनक ! बिबट्याच्या हल्ल्यात ३१ वर्षीय तरुणी ठार ; इगतपुरी तालुक्यातील घटना

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यात बिबट्याची दहशत वाढत चालली असून बिबट्याच्या हल्ल्यात आज ३१ वर्षीय तरुणी ठार झाली आहे. निशाणवाडी ( त्रिंगलवाडी ) येथील ही दुर्दैवी तरुणी आहे. या घटनेमुळे ह्या भागात दहशतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेबाबत माहिती मिळताच प्रादेशिक वन परिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांच्या नेतृत्वाखाली वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. मीनाक्षी […]

“योगेश”ने बिबट्याशी कडवी झुंज देऊन ३ शाळकरी मित्रांचे वाचवले जीव : इगतपुरी तालुक्यातील थरारक घटना

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील धार्णोली येथे बिबट्याने विद्यार्थ्यांवर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. बिबट्याशी झुंज देणारा योगेश रामचंद्र पथवे हा दहावीत शिकणारा विद्यार्थी आहे. योगेशचे शाळकरी मित्र प्रविण, निलेश, सुरेश यांच्यासह घरातून शाळेच्या दिशेने जात असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. समयसूचकता दाखवत योगेशने प्राणाची पर्वा न करता प्रसंगावधान राखत मित्रांना […]

अयोध्या सोहळा व २६ जानेवारीच्या पार्श्वभूमीवर इगतपुरी रेल्वे स्थानकात पोलिसांची करडी नजर

इगतपुरीनामा न्यूज – अयोध्या येथे सोमवारी प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा २६ जानेवारीच्या पार्श्वभूमीवर इगतपुरी लोहमार्ग पोलीस, रेल्वे सुरक्षा बल, दहशतवादी विरोधी पथक सज्ज झाले आहे. इगतपुरी रेल्वे स्थानकावर किंवा चालत्या रेल्वे गाडीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रेल्वे स्थानकात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. इगतपुरी रेल्वे स्थानकात मुंबईहुन येणाऱ्या व जाणाऱ्या प्रत्येक […]

कसारा घाटात वाहन पेटले ; जुन्या घाटातील वाहतूक नवीन घाटातून वळवली

इगतपुरीनामा न्यूज – नाशिक मुंबई महामार्गावर नाशिकहून मुंबईच्या दिशेने येत असताना महिंद्रा XUV कार क्रमांक MH 04 HF 3641 पेट घेतल्याची घटना घडली आहे. जुन्या कसारा घाटात घाट चढून आल्यावर टोप बारव जवळ ही घटना घडली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. वाहनचालकाने प्रसंगावधान राखत गाडी बाजूला उभी करत सर्वांना बाहेर काढले. यामुळे […]

error: Content is protected !!