पाण्यातून जीवनरक्षा करणाऱ्या जीवनरक्षकांना मानधन द्या : राष्ट्रपती पुरस्कार विजेते जीवरक्षक गोविंद तुपे मुख्यमंत्र्यांकडे मांडणार व्यथा

लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. १३ – वयाच्या १६ वर्षापासून आतापर्यंत नदीत बुडणाऱ्या व्यक्तींचे प्राण वाचविण्याचे महत्वपूर्ण काम बेलू येथील राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त गोविंद तुपे करतात. पदरमोड आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून जीवनरक्षकाचे काम ते करीत आहेत. नदी, विहीर, धरणातून बुडालेल्यांना आणि मृतदेहांना बाहेर काढण्याचे अवघड काम करण्यात त्यांचा हातखंडा आहे. याकामासाठी शासनाकडून मात्र कोणतेच […]

महागाईचा भडका! घरगुती गॅसच्या दरात तब्बल पन्नास रुपयांनी वाढ

इगतपुरीनामा न्यूज दि. १ : आर्थिक वर्षातल्या शेवटच्या महिन्याच्या पहिल्याच दिवशी आज घरगुती गॅसच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात आज तब्बल पन्नास रुपयांची वाढ झाली असून आधीच महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्य जनतेचे आर्थिक नियोजन अर्थात गृहिणींचे बजेट यामुळे कोलमडणार आहे. स्वयंपाकासाठी गॅस वापरणे दिवसेंदिवस महाग होत असून यापुढे नाईलाजाने […]

१०० वर्ष जुने महाकाय नारळाचे झाड भिंत आणि विद्युत तारांवर कोसळले ; इगतपुरी शहरातील घटना

इगतपुरीनामा न्यूज, दि. १२ – इगतपुरी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या इगतपुरी नगरपरिषदेच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वाचनालयातील १०० वर्ष जुना असलेल्या महाकाय नारळाचे झाड संरक्षक भिंत आणि विद्युत तारांवर कोसळले. नशीब बलवत्तर म्हणून झाड कोसळत असताना परिसरातील काही युवकांना आवाज आला. त्यांनी त्वरित परिसरातील नागरिकांना बाजूला केले. यामुळे मोठी जिवीत हानी टळली. स्थानिक मुलांनी झाड पडतानाचे […]

पिकविम्यासह शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या : कॉंग्रेस तालुकाध्यक्ष रमेश जाधव यांचे पालकमंत्र्यांना निवेदन

प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज, दि. १२ –इगतपुरी तालुक्यातील मुख्य भाताचे अवकाळीने मोठे नुकसान झाले असून पीकविमा कंपनीने अद्यापही दखल घेतली नाही. विम्याचा लाभ व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी काँग्रेस इगतपुरी तालुकाध्यक्ष रमेश जाधव यांनी नाशिकचे पालकमंत्री ना. दादा भुसे यांना केली आहे. काँग्रेस शिष्टमंडळाच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत. पालकमंत्री ना. भुसे यांनी योग्य […]

तोंडावर आली दिवाळी, पिकांना मारक ठरला अवकाळी : नुकसानभरपाईची सर्व भागातून होतेय मागणी

निलेश काळे : इगतपुरीनामा न्यूज, दि. 17 दुपारपासून कोसळणाऱ्या परतीच्या धगफुटीसदृश्य पावसाने भात पीके आडवे झाले आहेत. भाताची खाचरे पुर्णतः भरले असून काठोकाठ पाणी आहे. भात पीक आडवे झाल्याने धान कुजणार आहेच शिवाय जनावरांसाठीचा पेंढा देखील सडणार आहे. एकंदरीत भात पीकाचे उत्पादन घटणार असून शेतकरी चिंतातुर झाला आहे. खरीप हंगाम सरुन रब्बी हंगाम सुरू होण्यास […]

छातीपर्यंतच्या पाण्यातून २० किलो टमाट्याच्या क्रेटची वाहतूक करणाऱ्या “भरत”ला “देव” नदीच्या सेतूची प्रतीक्षाच : पोटासाठी शेतकऱ्याच्या जीवघेण्या कसरतींचा अंत कधी होणार ?

चंद्रकांत जगदाळे : इगतपुरीनामा न्यूज, दि. 19 निफाड तालुक्यातील ब्राह्मणवाडे येथील भरत चिमण घुमरे आणि कुटुंबीय शेती व्यवसायावर अवलंबून आहेत. देव नदी काठी त्यांची शेती आहे. या शेतीत राब राब राबून घाम गाळावा आणि घामाचे मोती बनवावे, यात अखे कुटुंबीय व्यस्त असते. परंतु, पावसाळा म्हंटला की घुमरे कुटुंबियांना सरसरून घाम फुटतो. कारण, देव नदी ओलांडून […]

खड्ड्यांचे साम्राज्य : आठव्या मैलाजवळ खड्ड्यामुळे मोटारसायकलचा अपघात : सारूळ येथील २ जण गंभीर जखमी

इगतपुरीनामा न्यूज, दि. 17 महामार्गावरील जीवघेणे खड्डे नागरिकांच्या जीवाला खड्डे पाडत आहेत. मुंबई आग्रा महामार्गावर खड्ड्यांमुळे आठवा मैला जवळ आज रात्री सव्वाआठ वाजता एका मोटार सायकलचा अपघात झाला. इगतपुरीकडून नाशिकच्या दिशेने जाणारी MH 15 GB 6138 ह्या क्रमांकाची मोटारसायकल पाण्यातील मोठ्या खड्ड्यात गेल्याने अपघात झाला. यामध्ये संजय चंद्रकांत जाधव वय 32, सुदाम पुंडलिक खाडे वय […]

पिंपळगाव मोर रस्ता, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि कातकरी बांधवांच्या प्रश्नांवर खंडेराव झनकर यांनी विरोधी पक्षनेते ना. अंबादास दानवे यांच्याशी साधला संवाद : टाकेद गटातील विविध महत्वाच्या विषयावर दखल घेणार असल्याचा मिळाला शब्द

इगतपुरीनामा न्यूज, दि. 10 इगतपुरी तालुक्यातील टाकेद जिल्हा परिषद गटातील विविध महत्वाच्या प्रश्नांवर शिवसेना राष्ट्रमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष खंडेराव शिवराम झनकर यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते ना. अंबादास दानवे यांनी संवाद साधला. टाकेद गटातील पिंपळगाव मोर ते वासाळी फाटा हा अत्यंत महत्वाचा असणारा रस्ता शासनाच्या हलगर्जीपणामुळे खड्यांसह शेवटची घटका मोजत आहे. ह्या भागातील नागरिक शासनाच्या […]

सुपलीची मेट व गंगाव्दारच्या लोकांचा स्थलांतराचा प्रश्न मार्गी लावणार – आमदार हिरामण खोसकर : अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची केली पाहणी

ज्ञानेश्वर महाले : इगतपुरीनामा न्यूज, दि. 9 प्रदक्षिणा मार्गातील ब्रह्मगिरीवर अवैध उत्खनन झाल्यामुळे धोकादायक बनलेल्या सुपलीची मेट व गंगाव्दार येथे दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे घरांचे व रस्त्याची प्रचंड नुकसान झाले. याबाबत दखल इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर यांनी भेट दिली. धार्मिक महत्त्व असलेल्या ब्रम्हगिरीच्या उत्खननामुळे पावसाळ्यात दगडे व दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढत आहे. भविष्यात सुपलीची […]

error: Content is protected !!